Nashik TCS Case: नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट; निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार फैसला

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे.

Nashik TCS Case: नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट; निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार फैसला

Nashik TCS Case: संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक टीसीएस (TCS) धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक रोड न्यायालयाने महत्त्वाची सुनावणी घेतली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार असल्याने, निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिक रोड येथील टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला धर्मांतरणासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप निदा खानवर करण्यात आला आहे. “हिंदू धर्म कसा चांगला नाही आणि इतर धर्म कसे श्रेष्ठ आहेत,” हे सांगून पीडित तरुणीचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न निदाने केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित तरुणीला काही विशिष्ट धार्मिक पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली होती आणि त्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती पीडित पक्षाच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडली आहे.

वकिलांचा युक्तिवाद आणि न्यायालयाची भूमिका
सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि पीडित तरुणीच्या वकिलांनी निदा खानच्या अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. हे प्रकरण केवळ एका तरुणीचे नसून सामाजिक शांतता बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तपासासाठी आरोपीची कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या अर्जावरील निर्णय 2 मे पर्यंत राखून ठेवला आहे.

हेही वाचा – Fraud Case: 5 किलो सोनं, महागड्या गाड्या अन् घरं; लग्नाचं आमिष दाखवून NRI तरुणाला ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने लावला करोडोंचा चुना

अटकेची टांगती तलवार
नाशिक टीसीएस प्रकरणातील या अपडेटमुळे पोलीस तपासाला वेग आला आहे. जर न्यायालयाने 2 मे रोजी अटकपूर्व जामीन फेटाळला, तर निदा खानला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत का, याचा तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत. सध्या संपूर्ण शहराचे लक्ष 2 मे रोजी होणाऱ्या न्यायालयीन निकालाकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number