Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर: देवेंद्र फडणवीसांनी 15 दिवसांपूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच पोलीस महासंचालकांना कडक कारवाईचे थेट निर्देश दिले होते.

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर: देवेंद्र फडणवीसांनी 15 दिवसांपूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश

Ashok Kharat Case: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदूगिरीचा आरोप असलेला अशोक उर्फ कॅप्टन खरात याच्या अटकेमागे राज्य सरकारची मोठी रणनीती असल्याचे आता समोर आले आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच पोलीस महासंचालकांना कडक कारवाईचे थेट निर्देश दिले होते. या विशेष हस्तक्षेपानंतरच नाशिक पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही मोठी कारवाई पूर्ण केली आहे. या अटकेमुळे अध्यात्माच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

फडणवीसांचा ‘स्पेशल रिपोर्ट’ आणि पोलिसांचा ॲक्शन मोड
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, खरात याच्याविरोधातील गंभीर तक्रारी आणि सोशल मीडियावर समोर आलेले आक्षेपार्ह व्हिडिओ गृह मंत्रालयापर्यंत पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी 15 दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला होता. अटकेपूर्वीच पोलिसांनी सर्व महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्स आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. खरातला न्यायालयात कोणतीही पळवाट मिळू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत भक्कम पुराव्यांची साखळी तयार केली असून, गृहमंत्रालयाकडून या तपासावर बारीक लक्ष ठेवले जात होते.

चोर शिरल्याचा बहाणा आणि पोलिसांचा सापळा
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर, गुन्हे शाखेने खरातला पकडण्यासाठी एखाद्या चित्रपटात शोभेल असा सापळा रचला होता. खरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. परिसरात संशय येऊ नये म्हणून ‘परिसरात चोर शिरला आहे’ अशी अफवा पसरवून पोलिसांनी घराला घेराबंदी केली. एक पथक खरातच्या घरात घुसले, तर दुसऱ्या पथकाने घराचे सर्व बाहेर पडण्याचे मार्ग रोखून धरले होते. अखेर घरातच दबा धरून बसलेल्या खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हेही वाचा – Dhananjay Munde: ‘राज्यातील मोठमोठे नेते मला संपवायला निघाले होते…’; धनंजय मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

भोंदूगिरीला बसणार लगाम? तपासाची व्याप्ती वाढली
या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. भोंदूगिरी आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार आता आक्रमक पवित्र्यात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. खरातच्या अटकेनंतर आता या प्रकरणात आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का, तसेच इतरही काही पीडित महिला आहेत का, याचा सखोल तपास नाशिक गुन्हे शाखा करत आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number