Nashik Traffic News: नाशिककरांना उन्हापासून मोठा दिलासा! दुपारच्या वेळी ‘हे’ 14 सिग्नल राहणार बंद; वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

नाशिक शहर वाहतूक विभाग आणि नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने संयुक्तपणे शहरातील वर्दळ कमी असलेल्या सिग्नलवर 'ब्लिंकर्स मोड' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik Traffic News: नाशिककरांना उन्हापासून मोठा दिलासा! दुपारच्या वेळी ‘हे’ 14 सिग्नल राहणार बंद; वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Nashik Traffic News: वाढत्या तापमानाचा पारा आणि रणरणत्या उन्हात सिग्नलवर ताटकळत उभ्या राहणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक शहर वाहतूक विभाग आणि नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने संयुक्तपणे शहरातील वर्दळ कमी असलेल्या सिग्नलवर 'ब्लिंकर्स मोड' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहनचालकांना भर उन्हात सिग्नल सुटण्याची वाट पाहत उभे राहावे लागणार नाही.

'ब्लिंकर्स मोड' म्हणजे काय?
'ब्लिंकर्स मोड'मध्ये ट्रॅफिक सिग्नलचे लाल, पिवळे आणि हिरवे दिवे क्रमाने न लागता, फक्त पिवळा दिवा सतत लुकलुकत (Blink) राहतो. याचा अर्थ असा की, त्या ठिकाणी टायमर बंद असेल. वाहनचालकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक पाहून काळजीपूर्वक रस्ता ओलांडायचा आहे.

वेळ आणि अंमलबजावणी

वेळ: दुपारी 1:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत.
उद्देश: एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेपासून दुचाकीस्वारांचे संरक्षण करणे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला 14 सिग्नलवर हा बदल करण्यात आला आहे.

या 14 चौकांत सिग्नलची कटकट संपणार
दुपारच्या वेळी खालील सिग्नल 'ब्लिंकर्स मोड'वर राहतील:
1. स्वामीनारायण चौक, 2. खडकाळी सिग्नल, 3. पाइपलाइन रोड, 4. जलतरण तलाव, 5. बारदान फाटा, 6. अशोका मार्ग, 7. टिकळवाडी, 8. विद्या विकास सर्कल, 9. साईनाथनगर, 10. कलानगर, 11. महिंद्रा सिग्नल, 12. समृद्धी टी-पॉइंट, 13. विहितगाव आणि 14. जेलरोड पाण्याची टाकी.

हेही वाचा – Hottest City in India : सूर्य ओकतोय आग! विदर्भातील हे शहर ठरले देशात सर्वात उष्ण; पारा 47 अंशांवर

हे 39 मुख्य सिग्नल मात्र नियमित सुरू राहणार

वाहतुकीची वर्दळ आणि सुरक्षेचा विचार करता, 39 महत्त्वाचे सिग्नल पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. यात प्रामुख्याने द्वारका सिग्नल, सीबीएस, मेहेर, अशोक स्तंभ, कॅनडा कॉर्नर, सिटी सेंटर मॉल, पाथर्डी फाटा, बिटको, उपनगर नाका, कॉलेज रोड (हॉलमार्क), गंगापूर नाका, आरटीओ कॉर्नर, आणि राऊ हॉटेल सिग्नलसह इतर मुख्य चौकांचा समावेश आहे. जरी सिग्नल ब्लिंकर मोडवर असले, तरी अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेग मर्यादेत ठेवून आणि आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज घेऊनच चौक ओलांडावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number