IND vs SA Playing 11: तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियात मोठी उलथापालथ; गिल नाही तर ‘या’ खेळाडूला डच्चू

रविवारी, 14 डिसेंबर रोजी HPCA स्टेडियमवर होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर हे दोन संघ या मैदानावर आमनेसामने येणार आहेत.<br/>

IND vs SA Playing 11: तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियात मोठी उलथापालथ; गिल नाही तर ‘या’ खेळाडूला डच्चू

IND vs SA Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार आता हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य धर्मशालात पोहोचला आहे. कटक आणि चंदीगड येथे झालेल्या सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी समसमान स्थितीत आहे. त्यामुळे रविवारी, 14 डिसेंबर रोजी HPCA स्टेडियमवर होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर हे दोन संघ या मैदानावर आमनेसामने येणार आहेत.

पराभवानंतर टीम इंडियावर दबाव

पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 101 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघाला 51 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निर्णायक सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

टॉप ऑर्डरची अपयशाची मालिका

भारतीय संघाची सर्वात मोठी चिंता म्हणजे अव्वल फळीचा फॉर्म. अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल हे तिघेही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेले नाहीत. विशेष म्हणजे या वर्षात सूर्यकुमार आणि गिल यांना एकही अर्धशतक करता आलेले नाही. या मालिकेत सूर्या केवळ 17, तर गिल फक्त 4 धावा करू शकला आहे.

हेही वाचा – John Cena Retires: जॉन सीनाची WWE मधून निवृत्ती; ‘नेव्हर गिव्ह अप’चा अध्याय संपला

कर्णधाराला वगळण्याचा प्रश्नच नसला तरी शुभमन गिलला विश्रांती देण्यात येणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाचा गिलवर असलेला विश्वास पाहता त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे धर्मशालातील सामना गिलसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो.

गोलंदाजीत फेरबदलाची शक्यता

दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची कामगिरी विशेष निराशाजनक ठरली. एका षटकात तब्बल 7 वाइड टाकत त्याने नियंत्रण गमावले आणि चार षटकांत 54 धावा दिल्या. एकूण 9 वाइड टाकणाऱ्या अर्शदीपला या सामन्यासाठी संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराहसोबत तो नवा वेगवान पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा – Lionel Messi in Mumbai : Lionel Messi च्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज! वाहतूक नियंत्रणासाठी मोठे बदल

10 वर्षांपूर्वीच्या पराभवाची आठवण

धर्मशालातील HPCA स्टेडियमवर भारताने आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने भारताने जिंकले असले तरी एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाला आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या त्या सामन्यात आफ्रिकेने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला होता. आता 10 वर्षांनंतर त्याच मैदानावर भारताला जुन्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.

टीम इंडियाचे संभाव्य खेळाडू – 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number