Salim Dola Arrest: अंडरवर्ल्डमध्ये खळबळ! दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोलाला तुर्कीत बेड्या; अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा पर्दाफाश

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या घडामोडीला दुजोरा दिला असून, या अटकेमुळे जागतिक स्तरावरील अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला आहे.

Salim Dola Arrest: अंडरवर्ल्डमध्ये खळबळ! दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोलाला तुर्कीत बेड्या; अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा पर्दाफाश

Salim Dola Arrest: भारताचा कुख्यात अमली पदार्थ तस्कर सलीम डोला याला तुर्कीमधील इस्तंबूल येथे एका मोठ्या मोहिमेअंतर्गत अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या घडामोडीला दुजोरा दिला असून, या अटकेमुळे जागतिक स्तरावरील अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला आहे. सलीम डोला हा गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर 'सिंथेटिक ड्रग्स'चे जाळे चालवत होता.

दाऊद इब्राहिमशी थेट कनेक्शन
तपासातून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सलीम डोला हा भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी थेट जोडलेला आहे. तो केवळ एक तस्कर नसून दाऊदचा अत्यंत विश्वासू साथीदार मानला जातो. डोंगरी भागातून गुन्हेगारीची सुरुवात करणारा डोला आपले संपूर्ण अमली पदार्थ सिंडिकेट सुरुवातीला मुंबईतून आणि नंतर दुबईतून नियंत्रित करत असे. त्याच्या अटकेमुळे अंडरवर्ल्डच्या अमली पदार्थ व्यापाराचे अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा यंत्रणांचे वाढते पाश
सलीम डोलावर यापूर्वीच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच त्याच्या विरोधात 'रेड कॉर्नर नोटीस' (RCN) देखील जारी करण्यात आली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने त्याचा मुख्य साथीदार मोहम्मद सलीम सोहेल शेख याला दुबईतून भारतात आणले होते, तर नोव्हेंबर 2025 मध्ये डोलाच्या मुलासह कुटुंबातील 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. यामुळे त्याच्यावर दबाव वाढला होता.

प्रत्यार्पणातील कायदेशीर पेच
सलीम डोलाला भारतात परत आणणे हे भारतीय सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्याकडे सौदी अरेबियाचा पासपोर्ट आहे. ज्या देशात त्याला अटक करण्यात आली आहे, तिथून थेट प्रत्यार्पण करणे कायदेशीर गुंतागुंतीमुळे सध्या कठीण वाटत आहे. मात्र, त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) मदतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रियपणे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Amravati News: अमरावतीत आई-वडिलांचा प्रताप, स्वत:च्याच 16 वर्षीय लेकीचं केलं मुंडण आणि..; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील जुना मोहरा
सलीम डोला हा प्रदीर्घ काळापासून मुंबईच्या डोंगरी आणि दक्षिण मुंबई परिसरात सक्रिय होता. त्याच्या अमली पदार्थांच्या पुरवठ्याची मोठी वाहिनी दुबईतून भारतात कार्यरत होती. सुरक्षा यंत्रणांच्या मते, डोलाच्या अटकेमुळे भारतातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल आणि लवकरच या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number