Virat Kohali: अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ‘या’ कारणामुळे विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर

13 जूनपासून 3 सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.

Virat Kohali: अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ‘या’ कारणामुळे विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर

Virat Kohali: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित मालिका लवकरच सुरू होत असून, तिच्या प्रारंभापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 6 जूनपासून कसोटी सामन्याने मालिकेला सुरुवात होणार असून, त्यानंतर 13 जूनपासून 3 सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

विराट आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का

दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियाकडून मैदानात उतरण्यासाठी विराट कोहली सज्ज होता. मात्र, दुखापतीमुळे त्याच्या पुनरागमनावर पाणी फिरले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची चाहत्यांचीही मोठी अपेक्षा होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत कोहली आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने दमदार खेळी करत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्या दुखापतीची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे.

बीसीसीआयने दुखापतीची दिली माहिती

बीसीसीआयच्या एका सूत्राने 'पीटीआय'शी बोलताना कोहलीच्या दुखापतीची माहिती दिली आहे. हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे तो संपूर्ण एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याचे सांगण्यात आले. विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित स्वरूपात खेळत असला, तरी त्याची लोकप्रियता आणि संघातील योगदान अद्याप तितकेच महत्त्वाचे मानले जाते. त्याच्या अनुपस्थितीमुळे मालिकेची रंगत काहीशी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पर्यायी खेळाडूच्या नावाची प्रतीक्षा

कोहलीच्या जागी कोणाला संधी दिली जाणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन कोणत्या खेळाडूवर विश्वास दाखवते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आगामी मालिकेच्या पार्श्वभूमीवर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी आता इतर वरिष्ठ खेळाडूंवर अधिक वाढणार आहे.

आयपीएलनंतर वृंदावनला भेट

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत वृंदावन येथे प्रेम आनंद महाराजांच्या आश्रमात गेला होता. अहमदाबादहून आग्राला आणि त्यानंतर वृंदावनला पोहोचलेल्या या जोडप्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ओळख टाळण्यासाठी दोघांनीही चेहऱ्यावर मास्क लावला होता. एकदिवसीय मालिकेपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी आश्रमाला भेट दिल्याचे मानले जात होते. मात्र, त्यानंतर कोहली दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.

हेही वाचा – Team India T20 Captain : टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार; सूर्यकुमारला डच्चू मिळताच 'ही' नावं चर्चेत

भारताचा एकदिवसीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, शिवम दुबे आणि इतर खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हा संघ अफगाणिस्तानविरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number