Baramati Bypoll 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे भावनिक आवाहन; सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची फिल्डिंग

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना सर्वपक्षीय पाठिंबा देऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आग्रही आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले आहे.

Baramati Bypoll 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे भावनिक आवाहन; सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची फिल्डिंग

Baramati Bypoll 2026: दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता भावनिक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना सर्वपक्षीय पाठिंबा देऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आग्रही आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेस आणि ओबीसी नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवल्याने बारामतीचा आखाडा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण: एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे आवाहन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला दिला. "एखाद्या बड्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. महायुती पूर्ण ताकदीनिशी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून विरोधकांना साद घालताना, या संवेदनशील परिस्थितीत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. राज्याच्या राजकीय वारशाचा मान राखून ही निवडणूक टाळावी, अशी महायुतीची भूमिका आहे.

काँग्रेस लढण्यावर ठाम; दिल्लीतून हिरवा कंदील
महायुतीच्या या भावनिक आवाहनाला न जुमानता काँग्रेसने मात्र निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. शरद पवार गट या निवडणुकीतून तांत्रिकदृष्ट्या मागे हटला असला तरी, काँग्रेसने ही जागा आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हायहकमांडने उमेदवार देण्यास संमती दिली असून, उमेदवाराच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे 'मैत्रीपूर्ण' लढतीची शक्यता मावळली असून थेट संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा – Baramati Bypoll 2026: बारामतीत सुनेत्रा पवारांना तगडे आव्हान; काँग्रेसकडून 'या' 5 नावांतून एकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

लक्ष्मण हाके यांची एन्ट्री; नवा पेच निर्माण
या निवडणुकीत आता तिसरा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अपक्ष किंवा इतर पक्षांच्या पाठिंब्याने रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. हाके हे उद्या (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपल्याला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला असून, यामुळे बारामतीतील जातीय समीकरणे बदलण्याची आणि मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number