DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा गुलाल; मविआ बॅकफूटवर

बँकेच्या बहुतांश जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले असून, या दारूण पराभवामुळे महाविकास आघाडीला (मविआ) मोठा राजकीय धक्का बसला आहे.<br/>

DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा गुलाल; मविआ बॅकफूटवर

DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांना चारी मुंड्या चीत करत एकहाती सत्ता काबीज केली आहे. सहकार क्षेत्रातील या प्रतिष्ठेच्या लढाईत महायुतीची रणनीती कमालीची यशस्वी ठरली. बँकेच्या बहुतांश जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले असून, या दारूण पराभवामुळे महाविकास आघाडीला (मविआ) मोठा राजकीय धक्का बसला आहे.

एकूण जागांपैकी महायुतीने तब्बल 8 जागा आधीच बिनविरोध जिंकून निवडणुकीत मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर उर्वरित 12 जागांसाठी थेट निवडणूक पार पडली. या चुरशीच्या लढतीत महायुतीच्या उमेदवारांनी आपले वर्चस्व राखत 12 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय नोंदवला. दुसरीकडे, महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली असून, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्याव्यतिरिक्त मविआच्या एकाही उमेदवाराला विजयाची चव चाखता आली नाही.

अंबादास दानवे आणि अतुल सावे यांच्यासह दिग्गजांची सरशी
या निवडणुकीतील सर्वात रंजक ठरलेल्या 12 जागांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यामध्ये महायुतीच्या पॅनलमधून रिंगणात उतरलेले शिवसेना (ठाकरे गट) आमदार अंबादास दानवे यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्यासोबतच राज्याचे मंत्री अतुल सावे, भाजप आमदार अनुराधा चव्हाण आणि शिवसेना आमदार संजना जाधव यांसारख्या बलाढ्य नेत्यांनीही निवडणुकीत बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

थेट मतदानातून महायुतीचे विजयी झालेले 11 उमेदवार:

अंबादास दानवे (शिवसेना ठाकरे गट आमदार)
अतुल सावे (मंत्री, भाजप)
अनुराधा चव्हाण (भाजप आमदार)
संजना जाधव (शिवसेना आमदार)
रवींद्र काळे
अर्जुन पाटील
रामराव शेळके
मुक्ता तांगडे
सुवर्णा जाधव
प्रभाकर काळे
शेषराव जाधव

निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आलेले 8 शिलेदार 
महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच केलेल्या मजबूत मोर्चेबांधणीमुळे पहिल्याच टप्प्यात त्यांचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये प्रामुख्याने शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांचा भरणा होता:

संजय शिरसाट (मंत्री, शिवसेना शिंदे गट)
विलास भुमरे (शिवसेना आमदार)
रमेश बोरणारे (शिवसेना आमदार)
अर्जुन गाडे
अनिल बोरसे
अब्दुल समीर
दिनेश परदेशी
संदीप निकम

हेही वाचा – Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल मोठी अपडेट समोर, अजून एक दिवस रुग्णालयातील मुक्काम वाढणार?

महाविकास आघाडीचा दारूण पराभव; केवळ एका जागेवर यश
महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने सर्व ताकद पणाला लावली होती, मात्र मतदारांनी मविआला पूर्णपणे नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. मविआचे सर्वच मातब्बर उमेदवार एकामागून एक पराभूत झाले. या संपूर्ण निवडणुकीत मविआसाठी एकमेव दिलासादायक बाब म्हणजे खासदार कल्याण काळे यांचा विजय. खासदार काळे यांनी प्रतिष्ठेच्या लढतीत आपली जागा राखण्यात यश मिळवले, परंतु ते मविआचे एकमेव विजयी उमेदवार ठरले. या एकतर्फी निकालानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा भगवा पूर्णपणे फडकला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number