नवी मुंबई प्रमाणेच आता पनवेल महानगर पालिकेतदेखील महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार आहे. शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पार्टी मिळून पनवेलमध्ये येणारी महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषिउत्पन्न बाजारपेठ या सर्व निवडणुका एकत्रित लढणार आहे.
पनवेलमध्ये भाजपाची एकहाती सत्ता असून भाजपाला शह देण्यासाठी आता सर्व पक्ष एकत्र आले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वपक्षीयांनी महाविकास आघाडी खाली आपली मूठ बांधली आहे. याविषयी अधिक माहिती शेकाप आमदार बाळाराम पाटील आणि शिवसेना नेते बबनदादा पाटील यांनी दिली आहे. तसेच पनवेल उरण महाविकास आघाडीतर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.