Tanvi Kamlekar: मिरज पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; 21 वर्षीय तन्वी कमलेकर ठरल्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती

काँग्रेसच्या 21 वर्षीय तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी निवड झाली असून, त्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत.

Tanvi Kamlekar: मिरज पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; 21 वर्षीय तन्वी कमलेकर ठरल्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती

Tanvi Kamlekar: सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीत राजकीय नेत्यांना थक्क करणारा निकाल लागला आहे. काँग्रेसच्या 21 वर्षीय तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी निवड झाली असून, त्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही सत्तांतर झाले असून, एका महाविद्यालयीन तरुणीच्या हाती प्रशासकीय धुरा आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

राजकीय वारसा नसतानाही ऐतिहासिक विजय
तन्वी कमलेकर या सध्या एमबीए (MBA) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबाला कोणताही मोठा राजकीय वारसा नाही. आपल्या कुटुंबातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आणि थेट निवडून येणाऱ्या त्या पहिल्याच सदस्य आहेत. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “शिक्षण आणि राजकारण या दोन्ही गोष्टी मी सक्षमपणे सांभाळणार,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिला रोजगार आणि ग्रामीण विकास हेच मुख्य ‘व्हिजन’
निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तन्वी कमलेकर यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “माझे पहिले उद्दिष्ट महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे असेल. गावातील छोटे रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यावर माझा भर असेल. प्रत्यक्ष गावागावात जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेण्याला मी प्राधान्य देईन.”

हेही वाचा – Parinay Phuke : सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्यावर कारवाई होणार? परिणय फुके यांचे मोठे विधान

सर्वपक्षीय नेत्यांचे मानले आभार
या निवडीसाठी त्यांनी काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या स्थानिक नेत्यांचे आभार मानले. “महाविकास आघाडीने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. विजयनगर आणि मोहन नगरमधील ग्रामस्थांनी मला दिलेल्या संधीचे मी नक्कीच सोनं करेन,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या निवडीमुळे मिरज पंचायत समितीच्या कामकाजात आता तरुण विचारांचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number