Maharani Tararani: ‘महाराणी ताराराणी जैन होत्या…’; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचे खळबळजनक विधान

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या, असा दावा केल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.<br/>

Maharani Tararani: ‘महाराणी ताराराणी जैन होत्या…’; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचे खळबळजनक विधान

Maharani Tararani: स्वराज्यरक्षिका महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक वारशाबाबत जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे महाराष्ट्रात नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या, असा दावा केल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमके काय आहे जैन मुनींचे विधान?
मुंबईत आयोजित जैन समाजाच्या मेळाव्यात आचार्य नयन पद्मसागर यांनी इतिहासातील विविध दाखले दिले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अनन्वित हाल केले, त्या काळात धर्माच्या रक्षणासाठी एका जैन महाराणीचा उदय झाला आणि त्या म्हणजेच ताराराणी, असे वक्तव्य आचार्यांनी केले. “संस्कृती वाचवण्यासाठी हातात शस्त्र घेणे हाच धर्म आहे,” असे सांगताना त्यांनी ताराराणींना थेट जैन धर्माशी जोडले.

ऐतिहासिक वास्तव काय सांगते?
इतिहासाच्या पानावरील नोंदीनुसार, महाराणी ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सात वर्षे मोगलांशी लढा दिला आणि स्वराज्य टिकवून ठेवले. कोल्हापूरच्या गादीच्या संस्थापक असलेल्या ताराराणींचा इतिहास महाराष्ट्राला पूर्णपणे ज्ञात असताना त्यांच्या कुळाबाबत असा दावा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन तुतारी’ला दिल्लीतून ‘रेड सिग्नल’! 12 खासदारांच्या पक्षप्रवेशाला भाजपने का लावला ब्रेक?

इंद्रजीत सावंत यांची टीका
प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला आहे. “महाराणी ताराराणी कोणत्या घराण्यातील होत्या, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. इतिहास माहित नसताना अशी विधाने करणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महापुरुषांना आपापल्या जाती-धर्मात ओढण्याच्या प्रयत्नातून इतिहास बदनाम करू नका, असा सल्लाही सावंत यांनी जैन मुनींना दिला आहे. शांतताप्रिय जैन समाजाने महापुरुषांच्या नावावरून अशा प्रकारचे वाद निर्माण करू नयेत, असे आवाहनही अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. छत्रपतींच्या घराण्यातील जाज्वल्य इतिहासाशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून आता या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची शक्यता असून, जैन मुनी आपल्या विधानावर ठाम राहणार की माफी मागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number