Parrot News : अडीच लाखांच्या पोपटाने घेतला मालकाचा जीव, कशी घडली दुर्दैवी घटना?

बंगळूरूतील गिरीनगर भागातील रहिवासी असलेल्या अरुण कुमार यांनी हाती स्टीलचा पाईप घेऊन घराच्या कंपाऊंडवर उभे राहून पोपट परत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी..

Parrot News : अडीच लाखांच्या पोपटाने घेतला मालकाचा जीव, कशी घडली दुर्दैवी घटना?

Parrot Owner Death News : बंगळूरूमध्ये अडीच लाख रुपयांच्या पाळीव मकाव पोपटाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताना एका 32 (बत्तीस) वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. अरुण कुमार असे मृत्यू झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अरुण कुमार यांनी अडीच लाख रुपयांना खरेदी केलेला मकाव पोपट घरातून उडून घराबाहेरील विजेच्या खांबावर जाऊन बसला होता. या अडीच लाखाच्या पोपटाला वाचवण्याच्या प्रयत्नात अरुण कुमार यांचा मृत्यू झाला.

पोपट वाचवण्याचा प्रयत्न पडला महागात
बंगळूरूतील गिरीनगर भागातील रहिवासी असलेल्या अरुण कुमार यांनी हाती स्टीलचा पाईप घेऊन घराच्या कंपाऊंडवर उभे राहून पोपट परत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्टीलच्या पाईपचा जास्त क्षमतेच्या विजेच्या तारेशी संपर्क झाला. हा संपर्क होताच अरुण कुमार यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का बसल्यामुळे ते कंपाऊंडवरून खाली कोसळले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अनैसर्गिक मृत्यूची नोंद
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "अरुण यांनी पोपटाला स्टीलच्या पाईपने वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्टीलच्या पाईपचा जास्त क्षमतेच्या विजेच्या तारेशी संपर्क झाला. त्यामुळे बसलेल्या विजेच्या झटक्याने अरुण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे." विजेचा धक्का बसल्यानंतर अरुणला जवळील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अरुण कुमार हे वाहनांच्या नंबर प्लेटचा व्यवसाय करत होते.

हेही वाचा – Crime News: पत्नीच्या त्रासाला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

दुसरी तशीच घटना दिल्लीत
दरम्यान, याचप्रमाणे दुसरी एक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील महिपालपूर येथे इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करताना विजेचा धक्का बसल्याने एका 23 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिली.

मैत्रिणीमुळे उघडकीस आली घटना
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्नानगृहातून बाहेर न आल्याने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला लक्षात आला. त्यानंतर हा ही घटना उघडकीस आली. दिल्लीतील या घटनेचा आणि बंगळूरूतील मकाव पोपटाच्या मालकाच्या मृत्यूच्या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. या घटनांनी विजेच्या तारांना स्पर्श होण्यापासून दक्ष राहण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

हेही वाचा – Mid-Air Emergency: विमानात अमेरिकन महिलेला पॅनिक अटॅक; बंगळुरूच्या डॉक्टरच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number