Local Body Elections: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला गती; ‘या’ दिवशी जाहीर होणार अंतिम मतदार यादी

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंबंधी कार्यक्रम जाहीर केला आहे.

Local Body Elections: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला गती; ‘या’ दिवशी जाहीर होणार अंतिम मतदार यादी

Local Body Elections: महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंबंधी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना 8 ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान दाखल करता येणार आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा दिनांक अधिसूचित केला असून, या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आधार म्हणून वापरण्यात येईल. जिल्हा परिषद निवडणूक विभागाद्वारे तयार केलेली प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल, तर अंतिम मतदार यादीसह मतदान केंद्रानिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा – Abu Azmi On Loudspeakers: नवरात्रीत अजानसाठी लाऊडस्पीकरला परवानगी द्या; अबू आझमींची सरकारकडे मागणी

मतदार यादीत नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा दुरूस्ती करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर नाही. यासंबंधी हरकती व सूचना फक्त प्रभागानिहाय चुका, मतदारांचा चुकून बदल, किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागात नसल्यास दुरुस्ती करण्यासाठी स्वीकारल्या जातात.

हेही वाचा – Mama Pagare: पंतप्रधान मोदींचा खिल्ली उडवणं भोवलं! भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते मामा पगारेंना नेसवली साडी

जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण

ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number