राजकीय नेत्याची मध्यप्रदेश पोलिसांवर दादागिरी

राजकारणातील नेत्यांना अनेक वेळा त्यांच्या सत्तेची हवा डोक्यात गेल्याचे चित्र पहायला मिळते. राजकीय मंडळी सत्ता आणि पदाचा वापर विविध सवलती मिळण्यासाठी करतात. दरम्यान राज्यातील एका आमदाराने मध्यप्रदेश पोलिसांवर दादागिरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदार संघाचे शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे मध्यप्रदेशातील सालबर्डी देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी गेले […]

राजकीय नेत्याची मध्यप्रदेश पोलिसांवर दादागिरी

राजकारणातील नेत्यांना अनेक वेळा त्यांच्या सत्तेची हवा डोक्यात गेल्याचे चित्र पहायला मिळते. राजकीय मंडळी सत्ता आणि पदाचा वापर विविध सवलती मिळण्यासाठी करतात. दरम्यान राज्यातील एका आमदाराने मध्यप्रदेश पोलिसांवर दादागिरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदार संघाचे शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे मध्यप्रदेशातील सालबर्डी देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी गेले होते.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र सालबर्डी हे देवस्थान आहे. महाशिवरात्रीला दोन्ही राज्यातील लाखो येथे येत असतात. या यात्रेचे विशेष म्हणजे यात्रा ही महाराष्ट्रात तर मुख्य पहाळावर असलेले मंदिर हे मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यात येते.

त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांचा ताफा तैनात असतो. दरम्यान महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले होते. त्याच दिवशी आमदार देवेंद्र भुयार सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेण्यासाठी आले होते.

तेव्हा त्यांनी पोलिसांना तात्काळ दर्शन देण्याचा आग्रह केला. पण गर्दी लक्षात घेता हे शक्य नसल्याने तुम्हाला रांगेत लागूनच दर्शन घ्यावे लागेल. असे पोलीस प्रशासनाने आमदारांना ठणकावून सांगितले.

दरम्यान दर्शन हे आमदार महोदयांच्या इच्छेविरुद्ध होत असल्याने अचानक आमदारांचा स्वाभिमान जागा झाला आणि थेट त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number