Anna Hazare: विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जने देश तापला! पवार, ठाकरे, राहुल गांधींनंतर आता अण्णा हजारे यांच्याकडून आंदोलनाची हाक

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.

Anna Hazare: विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जने देश तापला! पवार, ठाकरे, राहुल गांधींनंतर आता अण्णा हजारे यांच्याकडून आंदोलनाची हाक

Anna Hazare: वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET मधील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरून संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्च्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या बळप्रयोगामुळे देशभरात असंतोषाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उद्या विशेष आंदोलनाची हाक दिली आहे.

अण्णा हजारे उद्या सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील गांधी स्मारकासमोर 2 तासांचे मौन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणाला प्रतीकात्मकरीत्या "नगरचे जंतरमंतर" असे नाव देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तातडीने आंदोलक विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी अण्णांनी केली आहे. त्यांच्या या सहभागामुळे विद्यार्थी आंदोलनाला आता नवे नैतिक व राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – Delhi Police NHRC Complaint: दिल्ली पोलिसांविरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार; साध्या वेशातील व्यक्तींकडून तरुणींना मारहाण केल्याचा आरोप

गेल्या 1 महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीसह विविध विद्यार्थी संघटना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. सोमवारी झालेल्या लाठीमारानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंगळवारी रात्री जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेणारे शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेत्यांनी आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. आता अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनामुळे प्रशासनावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number