All England Open 2026: इतिहास रचण्यापासून लक्ष्य सेन फक्त एक पाऊल दूर; जाणून घ्या अंतिम सामना कधी आणि कुठे पाहायचा

अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-16, 18-21 आणि 21-15 असा पराभव करून लक्ष्यने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

All England Open 2026: इतिहास रचण्यापासून लक्ष्य सेन फक्त एक पाऊल दूर; जाणून घ्या अंतिम सामना कधी आणि कुठे पाहायचा

All England Open 2026: भारतीय बॅडमिंटनचा नवा तारा लक्ष्य सेन पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या 'ऑल इंग्लंड ओपन 2026' च्या जेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-16, 18-21 आणि 21-15 असा पराभव करून लक्ष्यने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष 8 मार्च रोजी होणाऱ्या ऐतिहासिक महामुकाबल्याकडे लागले असून, 25 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी लक्ष्य सज्ज झाला आहे.

25 वर्षांची प्रतीक्षा आणि सुवर्णसंधी
भारतासाठी ऑल इंग्लंड ओपनचे जेतेपद मिळवणे हे नेहमीच अभिमानास्पद राहिले आहे. यापूर्वी 1980 मध्ये महान खेळाडू प्रकाश पदुकोण आणि 2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर तब्बल 25 वर्षे भारताला या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. जर लक्ष्य सेनने हा अंतिम सामना जिंकला, तर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल आणि भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले जाईल.

अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची वेळ
लक्ष्य सेनने यापूर्वी 2022 मध्येही ऑल इंग्लंड ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र त्यावेळी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या स्पर्धेत त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि प्रगल्भ खेळ दाखवला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना चायनीज तैपेईच्या लिन चुन-यी याच्याशी होणार आहे. आपल्या दुसऱ्या फायनलमध्ये जुन्या पराभवाचा वचपा काढून जेतेपद पटकावण्याचा विश्वास लक्ष्यने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Montenegro Boxing Championships: भारताचे बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेचे स्वप्न भंगले! 'या' कारणामुळे भारतीय संघाची स्पर्धेतून माघार

अंतिम सामना कधी आणि कुठे पाहायचा?
बॅडमिंटन प्रेमींसाठी हा ऐतिहासिक सामना पाहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे:
तारीख आणि वेळ: रविवार, 8 मार्च 2026, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:20 वाजता.
ठिकाण: युटिलिटा एरिना बर्मिंगहॅम, इंग्लंड.
थेट प्रक्षेपण (TV): स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network).
लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप, वेबसाइट आणि BWF च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर हा सामना थेट पाहता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number