Indian Railway : रेल्वेच्या डब्यांवरील ‘या’ रंगीत रेषांचा अर्थ माहितीये का? केवळ डिझाइन नाही, तर प्रवाशांसाठी आहे महत्त्वाचा संकेत

या संकेतांमुळे प्रवाशांना गोंधळ टाळण्यास मदत होते. विशेषतः गर्दीच्या वेळी डब्यावरील रेषा पाहून आपला डबा ओळखता येतो.

Indian Railway : रेल्वेच्या डब्यांवरील ‘या’ रंगीत रेषांचा अर्थ माहितीये का? केवळ डिझाइन नाही, तर प्रवाशांसाठी आहे महत्त्वाचा संकेत

Indian Railway Coach Codes : भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी लोक प्रवास करतात, पण प्लॅटफॉर्मवर गाडी उभी असताना डब्यांवरील विशिष्ट रंगाच्या रेषांकडे आपले सहसा लक्ष जात नाही. अनेकांना वाटते की या रेषा केवळ रेल्वेच्या सौंदर्यासाठी किंवा डिझाइनचा भाग आहेत. मात्र, रेल्वेच्या नियमांनुसार या प्रत्येक रेषेचा एक विशिष्ट आणि तांत्रिक अर्थ असतो. रेल्वे डब्यांची ओळख पटवण्यासाठी आणि प्रवाशांची सोय होण्यासाठी या रंगांचा वापर केला जातो, जेणेकरून दुरूनही प्रवाशांना आपला डबा शोधणे सोपे जाईल.

रंगानुसार डब्यांची ओळख
रेल्वेच्या डब्यांवर खालीलप्रमाणे विविध रंगांच्या रेषांचा वापर केला जातो:
पिवळ्या रंगाच्या रेषा: निळ्या किंवा लाल रंगाच्या डब्यावर जर पिवळ्या रेषा असतील, तर तो डबा दिव्यांग (Physically Handicapped) किंवा आजारी व्यक्तींसाठी आरक्षित असतो.
पांढऱ्या रंगाच्या रेषा: निळ्या रंगाच्या डब्यातील शेवटच्या खिडकीवर असलेल्या पांढऱ्या रेषा 'General' म्हणजेच सामान्य श्रेणीच्या डब्याचा संकेत देतात.
हिरव्या रंगाच्या रेषा: जर निळ्या रंगाच्या डब्यावर हिरव्या रेषा दिसत असतील, तर तो डबा केवळ महिलांसाठी (Ladies Only) आरक्षित असल्याचे समजावे.
लाल रंगाच्या रेषा: तपकिरी किंवा इतर डब्यांवर लाल रंगाच्या रेषा असल्यास, तो डबा 'First Class' म्हणजेच प्रथम श्रेणीचा असल्याचे सूचित करतो.

गोंधळ टाळण्यास मदत
या संकेतांमुळे प्रवाशांना गोंधळ टाळण्यास मदत होते. विशेषतः गर्दीच्या वेळी डब्यावरील पांढऱ्या रेषा पाहून सामान्य तिकीट असलेले प्रवासी त्वरित आपला डबा ओळखू शकतात. तसेच, महिला आणि दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव डब्यांची ओळख पटवण्यासाठी हिरव्या आणि पिवळ्या रंगांची मोठी मदत होते. रेल्वेने प्रवास करताना या छोट्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या खुणांची माहिती असणे प्रत्येक प्रवाशासाठी फायदेशीर ठरते, ज्यामुळे प्रवासादरम्यान होणारी पळापळ थांबवता येते.

लिहिता-वाचता न येणाऱ्यांना उपयोग
भारतीय रेल्वेमध्ये साधारणपणे 2 प्रकारचे डबे (Coaches) वापरले जातात – निळ्या रंगाचे ICF आणि लाल रंगाचे LHB डबे. या दोन्ही प्रकारच्या डब्यांवर गरजेनुसार या रंगीत पट्ट्यांचा वापर केला जातो. आधुनिक रेल्वेमध्ये आता या खुणा अधिक स्पष्ट केल्या जात आहेत, जेणेकरून साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या प्रवाशांनाही रंगावरून डबा ओळखता येईल. तसेच, भाषा न समजणाऱ्या प्रवाशांचीही अडचण दूर होऊ शकेल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाल, तेव्हा या रंगीत रेषांकडे नक्की लक्ष द्या आणि तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number