Kiren Rijiju: ‘खऱ्या नेत्याची ओळख दशकांच्या प्रवासावरून…’; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, खासदार नितीन नवीन आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या योगदानाचे मनापासून कौतुक केले आहे.

Kiren Rijiju: ‘खऱ्या नेत्याची ओळख दशकांच्या प्रवासावरून…’; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया

Kiren Rijiju: देशभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, खासदार नितीन नवीन आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या योगदानाचे मनापासून कौतुक करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

विद्यार्थी कल्याणासाठी समर्पित प्रवास: किरेन रिजिजू
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “खऱ्या नेतृत्वाची खरी मोजमाप ही काही दिवसांत नव्हे, तर दशकांच्या कालावधीत केली जाते. धर्मेंद्र प्रधान यांचा संपूर्ण प्रवास हा सार्वजनिक जीवन आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित राहिला आहे,” असे रिजिजू म्हणाले. भारताच्या शिक्षण व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आणि प्रत्येक निर्णयात लाखो विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवण्यासाठी त्यांनी प्रचंड धैर्याने काम केले, असे सांगत रिजिजू यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सार्वजनिक जीवनातील सचोटीचे सर्वोच्च उदाहरण: नितीन नवीन
भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नितीन नवीन यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांच्या निर्णयाचे समर्थन केले. “धर्मेंद्र प्रधान यांनी देशाचे शैक्षणिक क्षेत्र सुधारण्यात आणि ऐतिहासिक ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ राबवण्यात मोलाचा वाटा उचलला. देशाच्या व्यापक हिताचा विचार करून त्यांनी दिलेला राजीनामा हा सार्वजनिक जीवनातील सचोटीचा आणि निस्वार्थ सेवेचा वस्तुपाठ आहे. पक्ष त्यांच्या या निर्णयासोबत पूर्णपणे पाठीशी उभा आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – CJP Protest Continues : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही दिल्लीत सीजेपीचे आंदोलन सुरूच; बाकी दोन मागण्यांसाठी लढण्याचा तरुणांचा निर्धार

पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील: गिरिराज सिंह
या घडामोडींवर बोलताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “भाजप नेहमीच देशाची एकता आणि समृद्धी याला प्राधान्य देतो. विद्यार्थ्यांनी मागण्या मांडताच पंतप्रधानांनी त्वरित पावले उचलली. अवघ्या 1 महिन्यात सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पाडून निकालही घोषित करण्यात आले,” असे ते म्हणाले. मात्र, काही बाह्य घटकांनी या मुद्द्यावरून देशात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही गिरिराज सिंह यांनी केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number