Sanjay Shirsat: ‘खरातच्या व्हिडिओंनी निचतेचा कळस गाठला…’; संजय शिरसाट यांचा संताप, कठोर कारवाईची मागणी

धर्माच्या नावाखाली किंवा कुणाच्या श्रद्धेचा फायदा घेऊन असे गैरप्रकार करणे हे अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.<br/>

Sanjay Shirsat: ‘खरातच्या व्हिडिओंनी निचतेचा कळस गाठला…’; संजय शिरसाट यांचा संताप, कठोर कारवाईची मागणी

Sanjay Shirsat:  सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या खरात प्रकरणावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. समोर आलेल्या व्हिडिओंनी निचतेचा कळस गाठला असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. धर्माच्या नावाखाली किंवा कुणाच्या श्रद्धेचा फायदा घेऊन असे गैरप्रकार करणे हे अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

श्रद्धेचा गैरफायदा घेणे अक्षम्य
संजय शिरसाट यांनी या प्रकरणातील व्हिडिओंवर भाष्य करताना म्हटले की, “एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवणे किंवा कुणाला तरी मानणे आणि त्या विश्वासाचा असा घृणास्पद गैरफायदा घेणे, यासाठी कोणते शब्द वापरावेत हेच सुचत नाही.” त्यांनी पुढे नमूद केले की, राजकारणात अनेक लोकांशी संपर्क येतो, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे किंवा तो काय उद्योग करतो, याची पूर्वकल्पना कोणालाही नसते. मात्र, श्रद्धेच्या नावाखाली जे काही घडले आहे, त्यावर महाराष्ट्राने आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

फोटोवरून राजकारण नको, पण दोषींवर कारवाई व्हावी
खरातचे अमित शहा यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत असल्याच्या मुद्द्यावरही शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली. “पुढाऱ्यांसोबत फोटो असण्याचा अर्थ असा नाही की सर्वच जण त्यात सामील आहेत. परंतु, जर कोणी जाणूनबुजून त्याला साथ दिली असेल किंवा या गुन्ह्यात कोणाचाही पाठिंबा असेल, तर त्या सर्वांची सखोल चौकशी झालीच पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोणाचेही नाव असो, या प्रकरणातील सत्य बाहेर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा – Chhagan Bhujbal: ‘तपासातून सत्य समोर येईलच’; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांनी चौकशीच्या मुद्द्यावर दिले महत्त्वाचे संकेत

राजकारणाला स्वच्छ करण्याची गरज
अशा प्रवृत्तींमुळे सर्वसामान्य जनतेचा संताप अनावर होत असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले. “लोकांच्या मनात या प्रकरणावरून प्रचंड चीड आहे आणि ती रास्त आहे. जर कोणी या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला असेल किंवा केसेस दडपल्या असतील, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला आणि राजकारणाला लागलेली ही कीड साफ करण्यासाठी हा तपास शेवटपर्यंत नेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number