Keralam Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसचा ‘विजयादशमी’ जल्लोष!के.सी. वेणुगोपाल-चेन्निथलांच्या गळाभेटीने कार्यकर्ते भावूक; मिठाई वाटत साजरा केला आनंद

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने 87 जागांवर आघाडी घेत बहुमत पार करत 10 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले आहे.

Keralam Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसचा ‘विजयादशमी’ जल्लोष!के.सी. वेणुगोपाल-चेन्निथलांच्या गळाभेटीने कार्यकर्ते भावूक; मिठाई वाटत साजरा केला आनंद

केरळम: “संघर्षातून मिळालेला विजय हा साखरेपेक्षाही गोड असतो,” याचीच प्रचिती आज केरळममधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. केरळम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (UDF) बहुमताचा 71 जागांचा टप्पा सहज ओलांडून 87 जागांवर झेप घेतली आहे. मागील 10 वर्षांपासून सत्तेच्या प्रतीक्षेत असलेल्या काँग्रेसचा हा ऐतिहासिक विजय कार्यकर्त्यांच्या संयमाचा आणि मेहनतीचा विजय मानला जात आहे. विजयाचे चित्र स्पष्ट होताच संपूर्ण केरळममध्ये काँग्रेस समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला असून तिरुवनंतपुरममधील वातावरण ‘काँग्रेसमय’ झाले आहे.

तिरुवनंतपुरममधील काँग्रेसच्या मुख्यालयात आज विजयाची एक वेगळीच पहाट पाहायला मिळाली. निकालांचे कल जसे जसे यूडीएफच्या बाजूने झुकू लागले, तसे नेत्यांच्या चेहऱ्यावरील तणाव मावळून आनंदाचे कारंजे फुटले. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून विजयाचा आनंद व्यक्त केला. या दोन दिग्गजांच्या गळाभेटीने उपस्थित कार्यकर्त्यांनाही भारावून टाकले, ज्याने 10 वर्षांच्या सत्तेच्या वनवासाची सांगता झाल्याचा संदेश संपूर्ण राज्याला दिला.

विजयाचा हा महाजल्लोष केवळ कार्यालयापुरता मर्यादित नव्हता, तर तो रस्त्यारस्त्यावर उतरला आहे. हातात तिरंगा आणि पक्षाचे झेंडे घेऊन हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ‘काँग्रेस झिंदाबाद’च्या घोषणांनी केरळचे आकाश दणाणून सोडले आहे. वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून यूडीएफचा हा ऐतिहासिक ‘कमबॅक’ साजरा केला जात आहे. 10 वर्षांनंतर मिळालेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, काँग्रेसच्या या विजयाची दिवाळी आज केरळच्या प्रत्येक घराघरात साजरी होताना दिसत आहे.

हेही वाचा: West Bengal Election 2026: झालमुरी खाल्ली त्याच भागात मताधिक्य…पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या व्हिडीओने केला होता रेकॉर्ड ब्रेक, जाणून घ्या काय घडलं ‘त्या’ मतदारसंघात?

राजकीयदृष्ट्या हा विजय डाव्या आघाडीसाठी (LDF) मोठा धक्का मानला जात आहे. सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारल्याने ते केवळ 48 जागांवर मर्यादित राहिले आहेत. 1960 च्या दशकानंतर भारतीय राजकारणात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमचा हा ‘सत्तापालट’ राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला मोठी ताकद देणारा ठरणार असून, डाव्यांच्या सत्तेचा सूर्य मावळून केरळमध्ये काँग्रेसच्या ‘हाता’चे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले आहे.

या महाविजयाने काँग्रेसच्या गोटात केवळ उत्साहच नाही, तर आगामी राजकारणासाठी नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. भाजपप्रणीत एनडीएला केवळ 4 जागांवर रोखून धरण्यात मिळालेले यश हे काँग्रेसच्या रणनीतीचा मोठा विजय मानला जात आहे. “केरळमच्या जनतेने दिलेला हा कौल केवळ आमचा विजय नाही, तर तो सत्याचा आणि जनसेवेचा विजय आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होताना यूडीएफच्या जागांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याने, विजयाचा हा जल्लोष रात्री उशिरापर्यंत केरळच्या कानाकोपऱ्यात घुमणार, यात शंका नाही. 

हेही वाचा: Vijay Thalapathy: तामिळनाडूत ‘थलपती’ वादळ! अभिनेता विजयच्या कुटुंबाचा जल्लोष, बंगल्याबाहेर चाहत्यांचा महापूर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number