CJP – Kapil Sibal : विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी कपिल सिब्बल मैदानात; ‘साक्षी’ पोर्टलसह केली ‘ही’ मोठी घोषणा

सरकारने उद्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सोडून त्यांच्यावरील एफआयआर (FIR) मागे घेतले नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे देशव्यापी आंदोलन पुन्हा छेडले जाईल, असा इशारा पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दिला आहे.

CJP – Kapil Sibal : विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी कपिल सिब्बल मैदानात; ‘साक्षी’ पोर्टलसह केली ‘ही’ मोठी घोषणा

Kapil Sibal: NEET पेपरफुटीप्रकरणी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने कोणत्याही आंदोलकावर कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने हा करार मोडून आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा गंभीर आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) केला आहे. जर सरकारने उद्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सोडून त्यांच्यावरील एफआयआर (FIR) मागे घेतले नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे देशव्यापी आंदोलन पुन्हा छेडले जाईल, असा इशारा पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दिला आहे.

हेही वाचा – Abhijeet Dipke Marriage: जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दीपकेच्या लग्नाची चर्चा; डिसेंबर-जानेवारीत…

आंदोलकांच्या मदतीसाठी ‘साक्षी’ पोर्टल आणि 1 कोटींचा कायदेशीर निधी
या संपूर्ण वादात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली की, देशभरात आंदोलकांवर होणाऱ्या बेकायदेशीर पोलीस कारवाईविरोधात विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत दिली जाईल. यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच पीडित विद्यार्थ्यांनी आपल्यावरील कारवाईचे व्हिडिओ आणि पुरावे अपलोड करावेत यासाठी ‘साक्षी’ नावाचे विशेष डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

विविध राज्यांत विद्यार्थ्यांवर कारवायांचा धडाका; वकिलांना मदतीचे आवाहन
सीजेपीच्या नेत्या रत्ना सिंह यांनी माहिती दिली की, बिहारमधील सीवान, पाटणा व छपरा यांसह आसाम आणि कोलकात्यात अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून काहींना अटक करण्यात आली आहे. एका विशिष्ट समाजातील तरुणांना व आंदोलकांना मदत करणाऱ्या वकिलांनाही लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर देशभरातील वकिलांनी पुढाकार घेऊन संकटग्रस्त विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत पुरवावी, असे आवाहन कपिल सिब्बल व सीजेपीच्या नेतृत्वाने केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number