Kangana Ranaut : ‘आमचं अफेअर असतं तर…’ चिराग पासवान यांच्यासोबतच्या नात्याबद्दल कंगना रणौतने बेधडक सांगून टाकलं

याच मुलाखतीत कंगनाने केवळ वैयक्तिक आयुष्यावरच नाही, तर राजकीय विषयांवरही भाष्य केले. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दलही विचार व्यक्त केले.

Kangana Ranaut : ‘आमचं अफेअर असतं तर…’ चिराग पासवान यांच्यासोबतच्या नात्याबद्दल कंगना रणौतने बेधडक सांगून टाकलं

Kangana Ranaut on Chirag Paswan Dating Rumors : बॉलिवूडची अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत सध्या आपल्या एका रोखठोक विधानामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि तिचे नाव जोडले जात असल्याच्या अफवांना कंगनाने पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत तिने मिश्किलपणे म्हटले की, "मी चिराग यांना गेल्या 10 वर्षांपासून ओळखते. जर आमच्यात खरोखरच काही प्रेमप्रकरण असते, तर आतापर्यंत आम्हाला मुलंही झाली असती." संसदेतील त्यांच्या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रंगणाऱ्या चर्चांवर तिने ही स्पष्टोक्ती दिली आहे.

मैत्रीच्या नात्याला अफवांचे ग्रहण
कंगनाने पुढे असेही सांगितले की, या विनाकारण पसरणाऱ्या अफवांमुळे आता चिराग पासवान तिला पाहिल्यानंतर रस्ता बदलतात. चिराग एक अत्यंत चांगले मित्र असल्याचे सांगत तिने स्पष्ट केले की, लोक त्यांच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावत आहेत. या दोघांनी 2011 मध्ये 'मिले ना मिले हम' या चित्रपटात एकत्र काम केले होते, जो चिराग पासवान यांचा अभिनयातील पदार्पण चित्रपट होता. तेव्हापासून असलेल्या या मैत्रीचे आता राजकीय सहकाऱ्यांमध्ये रूपांतर झाले असून लोक मात्र त्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याचे कंगनाने नमूद केले.

हेही वाचा – Bollywood Singer Marriage : प्रसिद्ध गायकाने गुपचुप उरकलं लग्न,बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ

राजकीय भूमिका आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक
याच मुलाखतीत कंगनाने केवळ वैयक्तिक आयुष्यावरच नाही, तर राजकीय विषयांवरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना ती म्हणाली की, मोदींचे व्यक्तिमत्व हे समानतेवर आधारित असून महिला आरक्षण विधेयक याचे उत्तम उदाहरण आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना तिने म्हटले की, ज्या पदासाठी ते पात्र नाहीत, त्या पदाचा मान मी त्यांना देऊ शकत नाही. सध्या कंगना राजकारणात पूर्णपणे सक्रिय असून संसदेत भाजपचे प्रतिनिधित्व करत आहे.

कंगनाचा कार्यप्रवास आणि आगामी चित्रपट
कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने सर्वात शेवटी 'इमर्जन्सी' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली असून दिग्दर्शनाची धुराही तिनेच सांभाळली आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली कंगना आणि चिराग पासवान हे दोन्ही नेते आता आपापल्या क्षेत्रात प्रस्थापित झाले आहेत. तरीही त्यांच्यातील जुन्या मैत्रीची चर्चा अधूनमधून होतच असते, ज्यावर आता कंगनाने आपल्या नेहमीच्या बेधडक शैलीत उत्तर देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा – Deool Band 2 First Poster: 'देऊळ बंद 2'चं पहिलं पोस्टर रिलीज; दुचाकीवर स्वार झाले स्वामी, पोस्टरने वाढवली उत्सुकता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number