Middle- East Tension : इराण-इस्रायल युद्धाचा फिवर कमी! JNPA बंदरात अडकलेले कंटेनर्स लागले मार्गाला; निर्यातदारांना काहीसा दिलासा

गेल्या एका आठवड्यात बंदरात अडकलेल्या कंटेनर्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 1 मार्च रोजी बंदरात सुमारे 5,000 TEUs कंटेनर्स अडकले होते, जे 8 मार्चपर्यंत कमी होऊन 3,200 TEUs वर आले आहेत.

Middle- East Tension : इराण-इस्रायल युद्धाचा फिवर कमी! JNPA बंदरात अडकलेले कंटेनर्स लागले मार्गाला; निर्यातदारांना काहीसा दिलासा

Middle-East Tension : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जागतिक व्यापाराला बसला असताना, भारताचे सर्वात रहदारीचे बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (JNPA) निर्यातदारांसाठी मोठा दिलासा दिला आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे बंदरात अडकलेल्या कंटेनर्सची संख्या आता लक्षणीयरीत्या कमी झाली असून, प्रशासनाने लागू केलेल्या विशेष कार्यपद्धतीमुळे (SOP) व्यापारातील अडथळे दूर होत आहेत. 

अडकलेल्या कंटेनर्सच्या संख्येत मोठी घट
JNPA प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात बंदरात अडकलेल्या कंटेनर्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 1 मार्च रोजी बंदरात सुमारे 5,000 TEUs कंटेनर्स अडकले होते, जे 8 मार्चपर्यंत कमी होऊन 3,200 TEUs वर आले आहेत. विशेषतः नाशिवंत वस्तूंच्या (Perishable items) कंटेनर्सची संख्या 2,000 वरून 1,000 पर्यंत खाली आली आहे. बंदरातील ही सुधारणा बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे शक्य झाली आहे.

विशेष टास्क फोर्स आणि समन्वय
मध्य पूर्वेतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यापार सुलभ करण्यासाठी JNPA ने एक विशेष 'टास्क फोर्स' स्थापन केला आहे. यामध्ये परकीय व्यापार सहसंचालक, सीमाशुल्क अतिरिक्त आयुक्त आणि JNPA चे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थॉमस यांची यासाठी 'सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. JNPA चे अध्यक्ष गौरव दयाल आणि उपाध्यक्ष रवीश कुमार सिंग हे सतत निर्यातदार, शिपिंग लाइन्स आणि विविध व्यापारी संघटनांशी (BCBA, APEDA, FFFAI) चर्चा करून मार्ग काढत आहेत.

हेही वाचा – Share Market Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच रेड अलर्ट! सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 550 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचा डोक्याला हात

निर्यातदारांसाठी विशेष सवलती आणि उपाय
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि निर्यातदारांना मदत करण्यासाठी बंदराने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
– पर्यायी साठवणूक: मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या मालासाठी तात्पुरती साठवणूक जागा उपलब्ध करून दिली आहे.
– विशेष जहाज सेवा: संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैराह, खोर फक्कन आणि ओमानमधील सोहार, मस्कत, सालालाह यांसारख्या बंदरांवर माल पोहोचवण्यासाठी विशेष जहाजांची सोय केली आहे.
– दंडात्मक शुल्क माफी: 'बॅक टू टाऊन' (BTT) प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क आणि दंड माफ करण्यात आला आहे.
– जलद तपासणी: सीमाशुल्क विभागाने ई-सील पडताळणीच्या आधारे मालाला त्वरित मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष तपासणीचा वेळ वाचत आहे.

नाशिवंत मालाचा मार्ग जलदपणे मोकळा
केळी, द्राक्षे यांसारख्या कमी काळ टिकणाऱ्या पिकांच्या निर्यातीला प्राधान्य देण्यात येत आहे. रिफर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनच्या सहकार्याने रेफ्रिजरेटेड कंटेनर्सची ने-आण करण्यासाठी पुरेशी ट्रेलर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. "आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि निर्यातदारांचे नुकसान कमी करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असे गौरव दयाल यांनी स्पष्ट केले आहे. समन्वयाने केलेल्या या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव असूनही भारतीय निर्यातदारांना आपला माल सुरक्षितपणे पाठवणे शक्य होत आहे.

हेही वाचा – Iran-Israel War Impact on Stock Market: इराण-इस्रायल युद्धाचा शेअर बाजाराला तडाखा; परदेशी गुंतवणूकदारांनी 4 दिवसांत काढले 21,000 कोटी रुपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number