जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई : शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंब्रा – कळवा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. यामुळे ते स्थानिकांशी संबंधित एखाद्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्यासाठी शिंदेंच्या भेटीला आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर शुक्रवारीच महायुतीची मुंबईत बैठक होणार होती. पण एकनाथ शिंदे यांनी गावी जात असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीची बैठक रद्द झाली. आता दिल्लीतून फोन आल्यानंतर महायुतीची एक किंवा दोन डिसेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. याआधीच जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. 

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल

  1. एकूण 288 जागा
  2. महायुती 230 जागांवर विजय
  3. भाजपा 132 जागांवर विजय
  4. शिवसेना 57 जागांवर विजय
  5. राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
  6. महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
  7. उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
  8. काँग्रेस 16 जागांवर विजय
  9. शरद पवार गट 10 जागांवर विजय
  10. इतर 12 जागांवर विजय

जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number