Manoj Jarange VS Dhananjay Munde : ‘त्याला माझ्या अंगावर गाडी घालायची होती…’; जरांगे पाटलांनी ऐकवली मुंडे आणि आरोपीची ‘ती’ ऑडिओ क्लिप

पत्रकार परिषदेत जरांगे पाटीलांनी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. पुढे त्यांनी धनंजय मुंडे आणि एका आरोपीमधला संवादही शेअर केला.

Manoj Jarange VS Dhananjay Munde : ‘त्याला माझ्या अंगावर गाडी घालायची होती…’; जरांगे पाटलांनी ऐकवली मुंडे आणि आरोपीची ‘ती’ ऑडिओ क्लिप

Jarange Patil Played Audio Clip: मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. यापूर्वी जरांगे यांनी माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. त्या प्रकरणात विरोधीचे खंडन झाल्यानंतर आता जरांगे पाटीलांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप सार्वजनिक करून नव्या पुराव्यांचा दावा केला आहे.

ऑडिओ क्लिपमधील संभाषण   

पत्रकार परिषदेत जरांगे पाटीलांनी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. पुढे त्यांनी धनंजय मुंडे आणि एका आरोपीमधला संवादही शेअर केला. धनंजय मुंडे दोन कोटी रुपये देतो म्हणाले, असं दोघांचं संभाषण आहे. हे दोघे गोळ्या आणणार होते आणि जेवणात देणार होते किंवा गाडी ताफ्यात घालून अंगावर घालायची, असा दोघांचा संवाद आहे.  

हेही वाचा – Dhananjay Munde on Manoj Jarange : जरांगेंचे आरोप मुंडेंनी फेटाळले; जरांगेंना ठणकावलं, म्हणाले ‘तुम्हाला महागात पडेल…’

जरांगे पाटील म्हणाले की, या क्लिपमधील संवादांवर त्वरित आणि निर्भीड चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढून लोकेशन पडताळणी करावी, तसेच आरोपी व धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करावे, अशी मागणी केली. जरांगे यांनी स्पष्ट केले की हे प्रकरण फक्त आरक्षणाचे नाही, तर इथं जिवनाचा प्रश्न आहे. म्हणून त्वरित उच्चस्तरीय तपास करावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे.  

हेही वाचा – Sheetal Tejwani : पार्थ पवारांच्या कंपनीबाबत मोठा खुलासा; ‘शीतल तेजवानी’ ठरली व्यवहारातील सूत्रधार

धनंजय मुंडेंकडून आरोपाचे खंडन  

यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्या आरोपांना ठामपणे खंडन केले होते. त्यांनी सांगितले की, या आरोपांमागे राजकीय हेतू आहे आणि खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी केली जात आहे. तसेच मुंडे यांनी जरांगे यांना सार्वजनिकरित्या तारीख-ठिकाण देऊन समोर येण्याचे आव्हानही दिले होते. आता जरांगेने क्लिप जाहीर केल्यावर पक्षीय व कायदेशीर वादाला नवे स्वरूप लाभले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number