Jabalpur News : वहिनीच्या प्रेमात वेडी झाली नणंद! भरला संसार सोडून दोघी झाल्या पसार; पण व्हॉट्सअॅप चॅट्सने उलगडलं रहस्य

सुमारे सात वर्षांपूर्वी आशुतोष या तरुणाने संध्यासोबत विवाह केला. दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले होते. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे.

Jabalpur News : वहिनीच्या प्रेमात वेडी झाली नणंद! भरला संसार सोडून दोघी झाल्या पसार; पण व्हॉट्सअॅप चॅट्सने उलगडलं रहस्य

Jabalpur News: मध्य प्रदेशातील जबलपूरमधील अमरपाटण भागातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नणंदेला तिच्या सुंदर वहिनीवर प्रेम झाले. त्यानंतर या दोघी घरातून पळून गेल्या. सुमारे सात वर्षांपूर्वी आशुतोष या तरुणाने संध्यासोबत विवाह केला. दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले होते. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. मुलाच्या शिक्षणासाठी ते जबलपूरमध्ये आले.

हेही वाचा – Girls Inside Madrasa bathroom : भयंकर! मदरशाच्या बाथरुममध्ये सापडल्या 40 मुली, तपासाअंती जे समोर आलं हे पाहून पोलिसही झाले अवाक्

आशुतोषची चुलत बहीण, मानसी जबलपूरमध्ये त्यांच्या घरी वारंवार येत असे. संध्या व मानसी यांच्यातील नाते साधारण कौटुंबिक म्हणून दिसत असे. दोघीही एकत्र बाजारात जात असतं, त्यामुळे कोणालाही काही संशय आला नाही. परंतु, 12 ऑगस्ट रोजी संध्या अचानक घरातून गायब झाली. दुसऱ्या दिवशी ती जबलपूर रेल्वे स्टेशनवर आढळली. तिने काही वेळ मुलासोबत घालवला. मात्र 22 ऑगस्ट रोजी ती मोबाईल सोडून पुन्हा बाहेर गेली आणि अद्याप बेपत्ता आहे.

हेही वाचा – Swami Chaitanyananda : मुलींच्या वसतिगृहात गुप्त कॅमेरा, रात्री रुममध्ये बोलवून…, स्वामी चैतन्यानंदच्या कुकृत्यामध्ये कर्मचाऱ्यांचाही सहभाग

व्हॉट्सअॅप चॅट्समधून झाला प्रेमसंबंधाचा उलगडा –   

आशुतोषने काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा फोन तपासला, तेव्हा त्याला व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये संध्या आणि मानसी यांच्यातील प्रेमसंबंध उघडकीस आले. यामुळे आशुतोषला मोठा धक्का बसला. एएसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, पीडित पतीने घामपौर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. पत्नी फोन घेऊन गेलेली नसल्यामुळे तिचे ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहेत, पण पोलिसांना काही तांत्रिक पुरावे मिळाले आहेत ज्यांच्या आधारे तिचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बेपत्तापत्नी आणि तिच्या नणंदेचा शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number