Lakshman Hake: ‘पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची वेळ आलीये…’ लक्ष्मण हाके दिल्लीतील CJP च्या आंदोलनात होणार सहभागी

महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनाचा चेहरा आणि नेते लक्ष्मण हाके यांनी थेट दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

Lakshman Hake: ‘पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची वेळ आलीये…’ लक्ष्मण हाके दिल्लीतील CJP च्या आंदोलनात होणार सहभागी

Lakshman Hake:  नवी दिल्ली येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ मधील कथित गैरव्यवहाराविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. आता या आंदोलनाला बळ देण्यासाठी इतर सामाजिक क्षेत्रांतूनही पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनाचा चेहरा आणि नेते लक्ष्मण हाके यांनी थेट दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. “लोकशाही वाचवण्यात विरोधक अपुरे पडल्यानेच आज तरुणाईला रस्त्यावर उतरावे लागले असून, पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत हाके यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा – Sharad Pawar Meet PM Modi: ‘ती’ फाईल अन् बंद दाराआड चर्चा… जंतरमंतरवरील आक्रोशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-पंतप्रधान मोदींमध्ये खलबतं

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अन् सरकारवर जोरदार हल्लाबोल
प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी, त्यांच्या भावनांशी आणि मानसिक आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पद्मश्री आणि रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेते निसर्गप्रेमी सोनम वांगचुक हे भारताची राष्ट्रीय संपत्ती आहेत. ते अत्यंत लोकशाही मार्गाने उपोषण करत असताना, त्यांच्यावर आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून हे आंदोलन मोडून काढण्याचा हुकूमशाही प्रयत्न केला गेला, असा गंभीर आरोप हाके यांनी केला. आंदोलनाला पाठिंबा देण्यास काहीसा उशीर झाला असला, तरी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण स्वतः दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आंदोलक तरुणांना बदनाम करू नका’ 
आंदोलनात असामाजिक किंवा आत्मघाती घटक घुसल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी या सर्व आरोपांचा कडाडून निषेध केला. “आंदोलन करणारे हे आपलेच तरुण आणि विद्यार्थी आहेत. ते काय सीमा पार करून आलेले रोहिंग्या आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जात, धर्म, पक्ष आणि प्रदेशाच्या पलीकडे जाऊन हजारो तरुण एकत्र आले आहेत, त्यामुळे या शांततापूर्ण आंदोलनाला ‘आतंकवादी’ किंवा ‘बदनाम’ करण्याचे कारस्थान कोणीही करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच अशा प्रकारे आरोप करणाऱ्यांचा आता ‘पापाचा घडा भरला आहे,’ असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number