Bharat Gogawale : ‘ते पण यशस्वी होईल…’; ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर भरत गोगावलेंचे सूचक वक्तव्य

शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते भरत गोगावले यांनी राजकीय घडामोडींवर आणि ऑपरेशन टायगर 3.0 वर अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Bharat Gogawale : ‘ते पण यशस्वी होईल…’; ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर भरत गोगावलेंचे सूचक वक्तव्य

Bharat Gogawale: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते भरत गोगावले यांनी राजकीय घडामोडींवर आणि ऑपरेशन टायगर 3.0 वर अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “बघूया, आत्ताच तुम्हाला सर्व गोष्टी सांगत नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात आणि अचानक त्याचा स्फोट करावा लागतो. पण मी तुम्हाला सांगतो, जे काही करू ते यशस्वी होईल,” असा दावा गोगावले यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात राज्यात काही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे करणार मोठी खेळी! खासदार फुटले, नेते फुटू नये म्हणून उचलणार मोठं पाऊल

संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन टायगर’ला गोगावलेंचे चोख उत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “आता राज्यभर ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार,” असे वक्तव्य केले होते. या विधानाचा समाचार घेताना भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. “आमचे सहकारी नरेश म्हस्के यांनी आधीच सांगितले आहे की, तो ‘तुडवा’ नाही तर ‘बुडवा’ आहे. त्याप्रमाणे त्यांची बुडवायची प्रक्रिया आता सुरू झाली आहे,” असा खोचक टोला गोगावले यांनी लगावला.

“तो बाळासाहेबांचा काळ होता, आता त्यांच्यात ती ताकद राहिलेली नाही”
ठाकरे गटाला आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत, असे स्पष्ट करताना गोगावले पुढे म्हणाले की, आम्हाला तुडवायला त्यांना खूप वेळ आणि कष्ट लागतील. कारण त्यांची ताकद आता पूर्णपणे संपलेली आहे. एक काळ आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा होता, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात आपण सर्वांनी पाहिले आहे की आता नक्की काय परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची अजिबात काळजी करण्याचे कारण नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number