Trupti Desai: ‘माझ्यामुळेच अशोक खरातसंबंधित पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले…’; तृप्ती देसाईंचा ठोंबरे-पाटलांवर पलटवार

ज्या लोकांनी पेनड्राईव्ह आणला होता, त्यांना मुख्यमंत्री आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे काम मीच केले आहे, असे देसाई यांनी ठामपणे सांगितले आहे.<br/>

Trupti Desai: ‘माझ्यामुळेच अशोक खरातसंबंधित पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले…’; तृप्ती देसाईंचा ठोंबरे-पाटलांवर पलटवार

Trupti Desai: भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधित वादग्रस्त पेनड्राईव्ह प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या वादात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उडी घेतली असून, हे संपूर्ण प्रकरण आपणच बाहेर काढल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. “ज्या लोकांनी पेनड्राईव्ह आणला होता, त्यांना मुख्यमंत्री आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे काम मीच केले आहे,” असे देसाई यांनी ठामपणे सांगितले आहे.

श्रेयवादावरून ठोंबरे-पाटलांवर पलटवार
या प्रकरणाचे श्रेय घेण्यावरून तृप्ती देसाई यांनी ठोंबरे-पाटील यांनी केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. देसाई म्हणाल्या की, “तुम्ही आज ज्या पद्धतीने आंदोलन करत आहात, त्याचे मूळ श्रेय मला जाते. हे प्रकरण मीच समोर आणले आहे. जे लोक पेनड्राईव्ह घेऊन आले होते, त्यांचा तुमच्यासारख्या राजकारणी महिलांवर विश्वास नव्हता, म्हणून ते माझ्याकडे आले. मी एक प्रामाणिक चळवळीतील कार्यकर्ती असल्यानेच पीडित लोक माझ्यावर विश्वास ठेवतात.”

‘सेटलमेंट’च्या आरोपांना चोख प्रत्युत्तर
अशोक खरात यांच्यासोबत ‘सेटलमेंट’ केल्याच्या आरोपांवर तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मी कोणत्याही प्रकारची सेटलमेंट करणारी कार्यकर्ती नाही. पीडित लोक माझ्याकडे येतात, हे पाहून तुमच्या पोटात दुखत आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांकडे लोक मदतीसाठी धाव घेतात, हेच या प्रकरणातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Rupali Thombare Patil: ‘कोणाला आणि का वाचवताय?’; रुपाली ठोंबरे पाटलांचा थेट सवाल, खरात प्रकरणात तृप्ती देसाईंचीही चौकशी करण्याची मागणी

पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
तृप्ती देसाईंच्या या दाव्यामुळे खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. पेनड्राईव्हमधील पुराव्यांच्या आधारे मुख्यमंत्री आता कोणती पावले उचलतात आणि पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे हे प्रकरण आगामी काळात अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number