Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत ? पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ

चुकीचे फोटो आणि नावे व्हायरल झाल्यामुळे एका कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर वस्तुस्थिती मांडल्यानंतर खरी 'स्टोरी' समोर आली आहे.<br/>

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत ? पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, सोशल मीडियावर एका पायलटच्या मृत्यूबाबत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. चुकीचे फोटो आणि नावे व्हायरल झाल्यामुळे एका कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर वस्तुस्थिती मांडल्यानंतर खरी 'स्टोरी' समोर आली आहे.

नेमका गोंधळ कुठे झाला?
बुधवारी सकाळी 'लिअरजेट 45' हे विमान मुंबईहून बारामतीकडे झेपावले आणि काही वेळातच कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर विमानाचे 'मूव्हमेंट लेटर' सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्रात कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची नावे पायलट म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे नेटिझन्सनी साहिल मदान यांचे फोटो शोधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Manoj Jarange Warns Sunetra Pawar: 'वहिनी, आता गिधाडांपासून सावध राहा…;' अजितदादांच्या निधनानंतर मनोज जरांगेंचा सुनेत्रा पवारांना सल्ला

k

पत्नीने सांगितलं सत्य; "माझे पती सुरक्षित आहेत!"
कॅप्टन साहिल मदान यांचा फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यावर त्यांच्या पत्नी, संजाम सहनी (मेकअप आर्टिस्ट) यांनी इन्स्टाग्रामवर एक भावूक आणि स्पष्टीकरणाची स्टोरी शेअर केली. त्यांनी लिहिले, "कृपया या बातम्या थांबवा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते." संजाम यांच्या या पोस्टमुळे स्पष्ट झाले की, साहिल मदान जिवंत असून ते सुखरूप आहेत. केवळ कागदोपत्री नाव असल्यामुळे लोकांचा गैरसमज झाला होता.

ऐनवेळी पायलट बदलला अन् घात झाला 
मिळालेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी विमानाचे वैमानिक बदलण्यात आले होते. कॅप्टन साहिल मदान यांच्याऐवजी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. सुमित कपूर यांनी या प्रवासाचे सारथ्य केले आणि दुर्दैवाने या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत को-पायलट शांभवी पाठव यांचाही मृत्यू झाला.

या अपघातातील मृतांची अधिकृत नावे 
दरम्यान, या विमान अपघातात अजित पवार (उपमुख्यमंत्री), विदिप जाधव (सुरक्षा रक्षक), कॅप्टन सुमित कपूर (वैमानिक), शांभवी पाठव (सह-वैमानिक), पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचा मृत्यू झाला आहे. 

k
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number