केएल राहुल क्रिकेटमधून घेणार संन्यास? निवृत्तीच्या चर्चेवर स्वतः सोडलं मौन; चाहत्यांची धाकधूक वाढली

केएल राहुलने निवृत्तीचा विचार केला होता का आणि भविष्यात त्याचा प्लॅन काय आहे, याचे उत्तर त्याने स्वतः एका मुलाखतीत दिले आहे.<br/>

केएल राहुल क्रिकेटमधून घेणार संन्यास? निवृत्तीच्या चर्चेवर स्वतः सोडलं मौन; चाहत्यांची धाकधूक वाढली

KL Rahul Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल गेल्या काही काळापासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कणा मानला जाणाऱ्या राहुलने अखेर या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने निवृत्तीचा विचार केला होता का आणि भविष्यात त्याचा प्लॅन काय आहे, याचे उत्तर त्याने स्वतः एका मुलाखतीत दिले आहे.

'निवृत्तीचा विचार आला होता, पण…'
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनशी संवाद साधताना राहुलने एक खळबळजनक खुलासा केला. त्याने मान्य केले की, काही काळापूर्वी त्याच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मात्र, सखोल विचार केल्यानंतर आपल्याला अजून बरेच क्रिकेट खेळायचे बाकी आहे आणि शरीरात अजून ऊर्जा शिल्लक आहे, याची जाणीव त्याला झाली. त्यामुळे सध्या तरी त्याने निवृत्तीचा विचार बाजूला सारला असून तो मैदानात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे.

'मैदानाबाहेरही जग आहे…'; राहुलचे स्पष्ट मत
निवृत्तीच्या निर्णयाबाबत बोलताना राहुल अतिशय प्रामाणिकपणे म्हणाला, "हा निर्णय घेणे माझ्यासाठी फार कठीण नसेल. क्रिकेटच्या जगाबाहेरही करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी योग्य निर्णय घेईन. ही अशी गोष्ट आहे जी जास्त काळ पुढे ढकलता येणार नाही, पण सध्या तरी मी खेळत राहणार आहे."

हेही वाचा – T20 World Cup 2026: एकीकडे बहिष्कारची भाषा, दुसरीकडे विश्वचषकासाठी संघ जाहीर; टी-20 विश्वचषकाआधी पाकिस्तानचा मोठा डाव

टी-20 मधून बाहेर, पण आयपीएलमध्ये सक्रिय
केएल राहुलने 2022 मध्ये आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग नाही. मात्र, आयपीएलमध्ये तो अजूनही सक्रिय आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य असून अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) चे नेतृत्व देखील केले आहे.

राहुलची आतापर्यंतची कामगिरी 
1992 मध्ये जन्मलेला राहुल सध्या 33 वर्षांचा आहे. त्याची आतापर्यंतची कारकीर्द प्रभावी राहिली आहे:
कसोटी: 67 सामने, 4,000 हून अधिक धावा, 11 शतके आणि 20 अर्धशतके.
एकदिवसीय (ODI): 94 सामने, 3,360 धावा, 8 शतके आणि 20 अर्धशतके.
टी-20: 72 सामने, 2,265 धावा आणि 2 शतके.
सध्या राहुल भारतीय संघासाठी यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना आता तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number