Iran-US Conflict: मध्यपूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस आणखी चिघळत चालला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ (IRGC) ने नुकताच पर्शियन आखातातील (फारसची खाडी) समुद्राखालील इंटरनेट केबल्सचा नकाशा जाहीर केल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इराण आता जगाची ‘डिजिटल नाडी’ कापण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
होर्मुजची खाडी: जगाचा डिजिटल कणा धोक्यात
पर्शियन आखात आणि विशेषतः होर्मुजची खाडी ही केवळ कच्च्या तेलासाठीच नाही, तर जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. या समुद्राखालून इंटरनेट केबल्सचे आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचे अवाढव्य जाळे पसरलेले आहे. इराणने याच केबल्सचे नकाशे सार्वजनिक केल्याने, ते या ठिकाणी ‘डिजिटल अटॅक’ किंवा फिजिकल तोडफोड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताला बसणार मोठा फटका; अर्थचक्र थांबण्याची भीती
जर इराणने या केबल्सना लक्ष्य केले, तर त्याचे थेट आणि विदारक परिणाम भारतावर होतील. भारताची संपूर्ण बँकिंग प्रणाली आणि डिजिटल पेमेंट (UPI) व्यवस्था इंटरनेटवर अवलंबून आहे. केबल्स कापल्या गेल्या तर एका क्षणात सर्व व्यवहार ठप्प होऊ शकतात. बँकांचे सर्व्हर आणि डेटा ट्रान्सफरसाठी याच समुद्राखालच्या केबल्सचा वापर होतो. यावर हल्ला झाल्यास आर्थिक व्यवहारांमध्ये हाहाकार उडू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हा हल्ला एखाद्या प्रत्यक्ष युद्धापेक्षाही जास्त घातक ठरेल, कारण यामुळे संपर्काची सर्व माध्यमे बंद होतील.
???The Islamic Guard Corps-linked Tasnim news agency has released a map of the Persian Gulf's undersea internet cables and cloud infrastructure, in what appears to be a veiled warning that the region's digital infrastructure could now be in Iran's crosshairs. pic.twitter.com/krPG2879vG — Argonaut (@FapeFop90614) April 22, 2026
इराणच्या आक्रमकतेचे कारण काय?
अमेरिकेने घातलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे इराण सध्या अडचणीत आहे. या कोंडीला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण आता ‘डिजिटल नाकेबंदी’चे शस्त्र उपसण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. जर होर्मुजच्या खाडीतील या केबल्सना इजा पोहोचली, तर केवळ भारतच नाही तर मध्य पूर्व आणि पाश्चात्य देशांमधील इंटरनेट सेवाही कोलमडून पडेल.