IPL 2026 Schedule: टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान IPL 2026 आयपीएलची घोषणा; ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

आगामी हंगामाची सुरुवात 28 मार्च पासून होणार असून, यंदा डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज होणार आहे.<br/>

IPL 2026 Schedule: टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान IPL 2026 आयपीएलची घोषणा; ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

IPL 2026 Schedule:  क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे.  आगामी आयपीएल 2026 (IPL 2026) च्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या धामधुमीत प्रसारक ‘स्टार स्पोर्ट्स’ने या मेगा इव्हेंटचा मुहूर्त जाहीर केला. आगामी हंगामाची सुरुवात 28 मार्च पासून होणार असून, यंदा डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज होणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार ‘ओपनिंग’ आणि ‘फायनल’
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा आयपीएलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. याशिवाय, एक प्लेऑफ सामनाही याच मैदानावर होईल. आरसीबीचे साखळी फेरीतील 5 सामने त्यांच्या होम ग्राउंडवर (चिन्नास्वामी) होतील, तर उर्वरित 2 घरगुती सामने रायपूरच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

निवडणुकांमुळे वेळापत्रकाचा पेच
प्रसारकांनी सुरुवातीची तारीख जाहीर केली असली, तरी बीसीसीआयने अजून संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही. या विलंबामागे 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका हे मुख्य कारण आहे. विशेषतः तमिळनाडू (चेन्नई), पश्चिम बंगाल (कोलकाता) आणि आसाम (गुवाहाटी) या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा अद्याप स्पष्ट नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रक राखून ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – IND vs NZ Final: भारताचा धावांचा डोंगर! संजू, इशान आणि अभिषेकच्या वादळापुढे न्यूझीलंड हतबल; विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान

विजेतेपद टिकवण्याचे आरसीबीसमोर आव्हान
गेल्या हंगामात (2025) पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबीने इतिहासात पहिल्यांदा आयपीएल करंडकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा हा संघ ‘चॅम्पियन’ म्हणून मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number