Sushma Andhare: ‘3 दिवसांतच सत्तेची नशा डोक्यात…’; पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा संताप

संजय दिना पाटलांच्या या धमकीवजा वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Sushma Andhare: ‘3 दिवसांतच सत्तेची नशा डोक्यात…’; पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा संताप

Sushma Andhare: ठाकरे गटाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील एका नव्या वादात अडकले आहेत. पक्षप्रवेशाला अवघे 3 दिवस उलटत नाहीत तोच, त्यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तीव्रतेने व्हायरल होत असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून त्यांनी शिंदे गटाविरोधात थेट संघर्ष पुकारला आहे.

सत्तेची आणि पैशाची नशा डोक्यात; सुषमा अंधारे यांचा घणाघाती आरोप
संजय दिना पाटलांच्या या धमकीवजा वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. "आमच्या पक्षात असेपर्यंत हे लोक अत्यंत शिस्तीत वागत होते, मात्र सत्ता बदलताच त्यांची ही शिस्त पार कोलमडली आहे," असा टोला अंधारे यांनी लगावला. अवघ्या 3 दिवसांत सत्ता आणि पैशाची नशा माणसाच्या डोक्यात कशाप्रकारे जाऊ शकते आणि माणूस किती टोकाचा बदलू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय दिना पाटील आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना अंधारेंचे थेट सवाल
पत्रकारांशी संवाद साधताना संजय दिना पाटील यांनी वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह होती, असे सांगत अंधारे यांनी या प्रकरणाचे थेट कनेक्शन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले. धमकी देताना पाटलांनी 'कोणत्याही कमिशनरकडे जा, मला फरक पडत नाही' असे उद्गार काढले होते. यावरून ते थेट गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनाच आव्हान देत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ज्या गृहखात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याच अधिकाऱ्यांना जर शिंदेंचे खासदार कस्पटासमान समजत असतील, तर फडणवीसांनी यावर तातडीने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.

हेही वाचा – Operation Tiger: सहाव्या खासदाराला फोडण्यात मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका?

महाराष्ट्रात गुंडगिरीला राजाश्रय? व्हीआयपी सुरक्षेवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न
दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवर बोट ठेवत सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले. सध्याच्या महाराष्ट्रात महिला, तरुणी, रेल्वे प्रवासी आणि थेट लोकप्रतिनिधीही सुरक्षित राहिलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला. शासकीय अधिकाऱ्यांना जाहीर धमक्या दिल्या जात असताना आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाही टार्गेट केले जात आहे. अशा गुंडगिरी करणाऱ्या आणि उन्मत्त झालेल्या नेत्यांना सरकारने 'Y+' दर्जाची सुरक्षा नेमकी कशासाठी दिली आहे? पत्रकारांचे दिवसाढवळ्या गेम करण्यासाठीच ही सुरक्षा पुरवली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number