CNG Price Hike: वाहनधारकांच्या खिशाला आंतरराष्ट्रीय युद्धाची झळ; CNG च्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) ही दरवाढ जाहीर केली असून, सुधारित दर 27 मेच्या मध्यरात्रीपासून अंमलात आले आहेत.

CNG Price Hike: वाहनधारकांच्या खिशाला आंतरराष्ट्रीय युद्धाची झळ; CNG च्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ

CNG Price Hike: जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात झालेल्या अडचणींचा थेट फटका आता पुणेकर वाहनधारकांना बसला आहे. पुण्यातील सीएनजी (CNG) दरात प्रति किलो 2 रुपये 50 पैशांची मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) ही दरवाढ जाहीर केली असून, सुधारित दर 27 मेच्या मध्यरात्रीपासून अंमलात आले आहेत. या दरवाढीमुळे पुण्यात आता सीएनजीचा दर 92.35 रुपयांवरून थेट 94.75 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

'स्ट्रेट ऑफ होर्मूज' बंद असल्याने देशात ऊर्जा संकट
अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम जाहीर झाला असला, तरी दोन्ही देशांमधील छुपे युद्ध आणि संघर्ष अजूनही शमलेला नाही. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आधी इराणने आणि त्यानंतर अमेरिकेने सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मूज' हा जलमार्ग रोखून धरला आहे. या नाकेबंदीमुळे आखाती देशांमधून भारताकडे येणारा कच्च्या तेलाचा आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पुरवठा साखळी तुटल्यामुळे भारतात इंधनाचे मोठे संकट उभे राहिले असून अनेक भागांत डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे नुकसान होत असून त्याचा बोजा सर्वसामान्यांवर टाकला जात आहे.

हेही वाचा – SC On Online Gaming GST: ऑनलाइन गेमिंगवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; पैजेवर लावलेल्या संपूर्ण रकमेवर भरावा लागणार 'इतका' GST

प्रवासाचा खर्च वाढणार 
एमएनजीएलने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, इनपुट गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या भावाने होरपळणाऱ्या नागरिकांना आता सीएनजीच्या महागाईचा सामना करावा लागणार आहे. या दरवाढीमुळे शहरातील रिक्षा, टॅक्सी आणि खासगी गाड्यांमधून प्रवास करणे अधिक महाग होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परिस्थिती पाहता नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचा अत्यंत जपून वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच कंपन्यांनी इंधन दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. जागतिक संकट पाहता आगामी काळात इंधनाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number