CJP मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; Abhjeet Dipke यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले जात आहेत?

'आम्ही देशात कोणतेही दुसरे अरविंद केजरीवाल तयार होऊ देणार नाही,' असा रोखठोक इशारा देत असंतोषाचा सूर आवळणाऱ्या कार्यकर्त्यांनी दीपके यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

CJP मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; Abhjeet Dipke यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले जात आहेत?

Internal Dispute in CJP Abhijeet Dipke Controversy: कॉकरोच जनता पार्टी (CJP) मधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले असून, संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपके यांच्या मनमानी कारभारामुळे आणि हुकूमशाही वृत्तीमुळे संघटनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आम्ही देशात कोणतेही दुसरे अरविंद केजरीवाल तयार होऊ देणार नाही,’ असा रोखठोक इशारा देत असंतोषाचा सूर आवळणाऱ्या कार्यकर्त्यांनी दीपके यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

‘सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे आंदोलनाला बळ; दिपके यांनी श्रेय लाटू नये’
आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिपके यांना केवळ 40 ते 50 लोकांचाच पाठिंबा होता, असे सांगत काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या लोकप्रियतेच्या दाव्यांची हवा काढून घेतली. जेव्हा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि स्वतः उपोषणाला सुरुवात केली, तेव्हाच या आंदोलनाला खऱ्या अर्थाने मोठे स्वरूप प्राप्त झाले; कारण जनता वांगचुक यांच्या विचारांचा आदर करते. असे असताना प्रसारमाध्यमांसमोर ‘कुठल्याही एका चेहऱ्याला मोठे करू नका’ असा सल्ला देणाऱ्या दीपके यांच्यातच आता अहंकार निर्माण झाला आहे, असा घणाघाती आरोप आंदोलकांनी केला आहे. गेल्या 40 दिवसांच्या आंदोनात जोडल्या गेलेल्या स्वयंसेवकांना भेटण्यासाठी दिपके यांच्याकडे वेळ नसून, त्यांच्या या अहंकारी वृत्तीमुळे आंदोलनाचे अतोनात नुकसान होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: ‘भिऊ नका’ हा मेसेज नेमका कोणासाठी? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांच्या भूमिकेवर रोखठोक सवाल

डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा विसर अन् पारदर्शकतेचा अभाव
संघटनेतील स्वयंसेवक आणि प्रत्यक्ष आंदोलनात उतरलेल्या कार्यकर्त्यांचे मत विचारात न घेता सर्व निर्णय घेतले जात असल्याबद्दल काही आंदोलक नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे मंचावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र दाखवून भाषणे केली जातात, मात्र दुसरीकडे प्रत्यक्ष कारभारात त्यांच्या लोकशाहीवादी विचारांचे अजिबात पालन केले जात नाही. संघटनेच्या अंतर्गत कामकाजात कोणतीही पारदर्शकता उरलेली नाही, असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृतीतील या विरोधाभासावर बोट ठेवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number