इन्स्टाग्रामची सेवा काही काळ ठप्प झाली होती. परंतु या मागचे कारण अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
डाउनडिटेक्टर ने दिलेल्या माहितीनुसार,
जवळपास ५६ टक्के इन्स्टाग्राम युजर्सना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तर २३ टक्के युजर्सना लॉग इन करण्यात काही तांत्रिक समस्या येत होत्या. आतापर्यंत २१ टक्के युजर्सनी इन्स्टाग्रामकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे या तक्रारींची दखल कंपनीकडून घेतली जाते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
काही तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प झाल्याचं त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तसेच इन्स्टाग्रामच्या ठप्प सेवेमुळे जगभरातील जवळपास १,८०,००० युजर्सना फटका बसला होता.