भारतीय नौदलाच्या हालचालींमुळे पाकिस्तानची झोप उडाली; हल्ल्याच्या भीतीने देशात भीतीचे वातावरण

भारतीय नौदल मोठा युद्ध सराव करत आहे. नौदलाच्या या हालचालीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.<br/>

भारतीय नौदलाच्या हालचालींमुळे पाकिस्तानची झोप उडाली; हल्ल्याच्या भीतीने देशात भीतीचे वातावरण
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने सीमेवरील गस्त वाढली आहे. पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे. आता भारतीय नौदलानेही एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय नौदल मोठा युद्ध सराव करत आहे. नौदलाच्या या हालचालीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

भारतीय नौदलाचा युद्ध सराव – 

भारतीय नौदल 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान गुजरातजवळ सागरी सराव करणार आहे. या सरावादरम्यान, भारतीय नौदल सागरी सीमेपासून 85 नॉटिकल मैल मागे असेल. तथापि, पाकिस्तान देखील 30 ते 2 मे दरम्यान सराव करणार आहे. दोन्ही देशांच्या नौदला समोरासमोर आल्यामुळे युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे.

हेही वाचा – आमच्याकडं अणुबॉम्ब.. कोणीही हल्ला करू शकत नाही; मरियम नवाजांची पोकळ धमकी

1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन ट्रायडंट – 

भारतीय नौदलाच्या सरावामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानला भीती आहे की, भारतीय नौदल 1971 प्रमाणे परिस्थिती निर्माण करू शकते. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय नौदलाने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन ट्रायडंट सुरू केले होते. या कारवाईत नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यात अनेक पाकिस्तानी जहाजे बुडाली होती.

हेही वाचा – पहलगाम हल्ल्याबाबत मोठी बातमी! दहशतवाद्यांनी आठवड्यापूर्वी केली होती अनेक पर्यटन स्थळांची रेकी

हल्ल्याची भीतीने पाकिस्तानचा थरकाप – 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सतत हल्ल्याची भीती जाणवत आहे. अलिकडेच, पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली आणि दावा केला की, भारत 24-36 तासांच्या आत लष्करी कारवाई सुरू करू शकतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रत्येक भारतीयाकडून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी होत आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number