Austin Bar Shooting: टेक्सास गोळीबारात भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीचा मृत्यू; हल्लेखोराच्या ‘इराण कनेक्शन’ने अमेरिकेत खळबळ

टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे एका गजबजलेल्या बारमध्ये झालेल्या भीषण गोळीबारात 21 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी सविता शान हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Austin Bar Shooting: टेक्सास गोळीबारात भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीचा मृत्यू; हल्लेखोराच्या ‘इराण कनेक्शन’ने अमेरिकेत खळबळ

Austin Bar Shooting: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे एका गजबजलेल्या बारमध्ये झालेल्या भीषण गोळीबारात 21 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी सविता शान हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने केवळ भारतीय समुदायातच नव्हे, तर संपूर्ण अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोराच्या कपड्यांवरील चिन्हांमुळे आणि त्याच्या विशिष्ट पेहरावामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हल्लेखोराचा पेहराव आणि संशयाची सुई
या हल्ल्यातील 53 वर्षीय हल्लेखोर नियागा डियाने (Ndiaga Diagne) हा पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. मात्र, प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करतेवेळी हल्लेखोराने इराणच्या ध्वजाचे डिझाइन असलेले कपडे परिधान केले होते आणि त्याच्यावर ‘Property of Allah’ असे शब्द लिहिलेले होते. डियाने हा मूळचा सेनेगलचा रहिवासी असून तो सन 2000 मध्ये टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेत दाखल झाला होता. त्याच्या या विशिष्ट पेहरावामुळे या हल्ल्यामागे धार्मिक किंवा राजकीय हेतू होता का, यादृष्टीने संशय बळावला आहे.

विद्यार्थिनीचा करुण अंत
या गोळीबारात मृत्युमुखी पडलेली सविता शान ही टेक्सास विद्यापीठातील मॅककॉम्ब्स स्कूल ऑफ बिझनेसची अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. ती मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम्स आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी घेत होती. तिच्या प्राध्यापकांनी तिचे वर्णन एक 'सुपरस्टार स्टुडंट' असे केले असून, येत्या मे महिन्यात तिची पदवी पूर्ण होणार होती. दुर्दैवाने पदवी मिळवण्यापूर्वीच तिचा अंत झाला. या घटनेत तिच्यासोबत रायडर हॅरिंग्टन (19) आणि जॉर्ज पेडरसन (30) या दोन अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – Supreme Leader of Iran: इराणमध्ये ऐतिहासिक सत्तापालट; सर्वोच्च नेतेपदी खामेनीचे चिरंजीव मोजतबा खामेनी यांची नियुक्ती

नेमकं काय घडलं?
ऑस्टिनमधील एका बारमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असताना हल्लेखोराने रायफलने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ झाली. एफबीआय (FBI) आणि स्थानिक पोलीस सध्या या गोळीबारामागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. हल्लेखोराचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी किंवा इराणशी थेट संबंध होता का, याचा तपास अत्यंत गोपनीयतेने सुरू आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number