Asia Cup 2025 : अंतिम सामन्यापूर्वी भारताची श्रीलंकेशी लढत! India vs Sri Lanka सामन्यात अभिषेक शर्माने 22 चेंडूत झळकावले अर्धशतक

कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. सूर्याने 13 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. 22 चेंडूत 50 धावा करून त्याने टीम इंडियाला बळकटी दिली.

Asia Cup 2025 : अंतिम सामन्यापूर्वी भारताची श्रीलंकेशी लढत! India vs Sri Lanka सामन्यात अभिषेक शर्माने 22 चेंडूत झळकावले अर्धशतक

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कप सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. सूर्याने 13 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. 22 चेंडूत 50 धावा करून त्याने टीम इंडियाला बळकटी दिली. 13 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर संजू सॅमसनने हसरंगाच्या गोलंदाजीवर 6 धावा केल्या. सध्या भारताची स्थिती 126/3 अशी आहे. 

अभिषेक शर्माने दमदार खेळी केल्यानंतर बाद –

आक्रमक खेळी केल्यानंतर अभिषेक शर्मा बाद झाला. त्याने फक्त 31 चेंडूत 1 धावा केल्या. शर्माने आठ चौकार आणि दोन षटकार मारले. 10 षटकांनंतर भारताचा स्कोअर 3 बाद 100 धावा असा होता. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव बाद झाले आहेत.

पहिल्या षटकानंतर, भारताने कोणतेही नुकसान न करता 8 धावा केल्या. शुभमन गिल 4 आणि अभिषेक शर्मा 3 धावांवर खेळत होते. दुसऱ्या षटकानंतर भारताची धावसंख्या 22 झाली. तिसऱ्या षटकानंतर भारताने 36 धावा केल्या. पाच षटकानंतर, भारताने एक विकेट गमावून 59 धावा केल्या. शुभमन गिल फक्त 4 धावांवर बाद झाला, तर अभिषेक शर्मा फलंदाजीत चांगली कामगिरी करत होता. अभिषेक शर्माने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 31 चेंडूत 61 धावा करून भारताला बळकटी दिली. 

हेही वाचा – Asia Cup 2025: आचारसंहिता उल्लंघन प्रकरणात सूर्यकुमार दोषी; पाकिस्तानी खेळाडू फरहान आणि रौफ यांच्यावरील निकाल अद्याप प्रलंबित

दरम्यान, टीम इंडियाच्या कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना विश्रांती देण्यात आली असून त्याऐवजी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग संघात सामील झाले. भारताने पहिल्या फलंदाजीत उच्च धावसंख्या करण्याचे लक्ष्य ठेवले.

भारताचे प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

हेही वाचा – India VS Pakistan Cricket Final Match : भारत-पाकिस्तान अंतिम सामना, जाणून घ्या सविस्तरपणे

श्रीलंकेचा प्लेइंग इलेव्हन: पथुम निस्सांका, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कुसल परेरा, चरिथ असलंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, जानिथ लियानागे, दुष्मंथा चामीरा, महेश थिकेशना, नुवान तुषारा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number