World Responsible Nations : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! या यादीत पटकावले स्थान; जगातल्या महासत्ताही पडल्या बाहेर

लष्करी आणि आर्थिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिका, चीन आणि रशिया या देशांना भारताने जबाबदारीच्या बाबतीत खूप मागे टाकले आहे. पहिल्या दहात तर सोडाच, पण विसातही हे देश कुठेच नाहीत.

World Responsible Nations : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! या यादीत पटकावले स्थान; जगातल्या महासत्ताही पडल्या बाहेर

World Responsible Nations : जागतिक व्यासपीठावर भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 'वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाउंडेशन' (WIF) या संस्थेने 2026 सालासाठी 'जबाबदार देशांची यादी' (Responsible Nations Index) जाहीर केली असून, भारताने यात मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे लष्करी आणि आर्थिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिका, चीन आणि रशिया या देशांना भारताने जबाबदारीच्या बाबतीत खूप मागे टाकले आहे.

महासत्ता टॉप 10 मधून बाहेर!
या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जगावर वर्चस्व गाजवणारे अमेरिका, चीन आणि रशिया हे देश पहिल्या 10 तर सोडाच, पण पहिल्या 20 देशांमध्येही स्थान मिळवू शकलेले नाहीत. सिंगापूर या यादीत 0.6194 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून जगातील 'सर्वात जबाबदार देश' ठरला आहे. स्वित्झर्लंड दुसऱ्या आणि डेन्मार्क तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या 10 मध्ये युरोपीय देशांचे वर्चस्व दिसून येते, तर आशियातून केवळ सिंगापूर आणि भारत (16 व्या स्थानी) आघाडीवर आहेत.

भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारताने या यादीत 16 वा क्रमांक पटकावला असून भारताला 0.5515 गुण मिळाले आहेत. एकूण 154 देशांच्या या सर्वेक्षणात भारताने 66 व्या स्थानावरील अमेरिका आणि 68 व्या स्थानावरील चीनला धूळ चारली आहे. रशिया तर चक्क 96 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. पाकिस्तान या यादीत 90 व्या स्थानी आहे. केवळ आर्थिक ताकद असून चालत नाही, तर ती जबाबदारीने वापरणे किती महत्त्वाचे आहे, हेच भारताच्या या कामगिरीतून सिद्ध झाले आहे.

कशाच्या आधारावर ठरली ही क्रमवारी?
हा निर्देशांक केवळ जीडीपी (GDP) किंवा लष्करी ताकद मोजत नाही. 'वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाउंडेशन'ने ही यादी तयार करताना मुख्यत्वे चार गोष्टींचा आधार घेतला आहे:
– प्रामाणिक सुशासन: देशातील राज्यकारभाराची पारदर्शकता.
– सामाजिक कल्याण: नागरिकांचे आरोग्य, शिक्षण आणि समानता.
– पर्यावरणीय जबाबदारी: निसर्ग आणि हवामान बदलासाठी देशाने घेतलेले निर्णय.
– जागतिक जबाबदारी: आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांना केलेली मदत आणि शांतता राखण्यासाठीची भूमिका.

विकसनशील देशांचा जागतिक संदेश
या यादीतून एक मोठा संदेश जगाला मिळाला आहे की, एखाद्या देशाची समृद्धी ही केवळ त्याच्या तिजोरीतील पैशांवरून नाही, तर तिथल्या व्यवस्थेच्या नैतिकतेवरून ठरते. भारताने डिजिटल गव्हर्नन्स, पर्यावरण पूरक धोरणे आणि जागतिक संकटात (उदा. लस पुरवठा किंवा आपत्ती व्यवस्थापन) घेतलेली पुढाकाराची भूमिका यामुळेच भारत आज अमेरिका आणि चीनसारख्या देशांच्या पुढे उभा आहे. भारताची ही झेप आगामी काळात भारताला पहिल्या 10 देशांच्या यादीत नेण्यासाठी पूरक ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॉप 10 मध्ये या देशांचा समावेश

1 – सिंगापूर
2 – स्वित्झर्लंड
3 – डेन्मार्क
4 – सायप्रस
5 – स्वीडन
6 – चेकिया
7 – बेल्जियम
8 – ऑस्ट्रिया
9 – आयर्लंड
10 – जॉर्जिया

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number