Match-Day Economy: भारत-पाक सामन्याने मोडले रेकॉर्ड; जाहिरातदारांनी 10 सेकंदासाठी मोजले लाखो रुपये

या हाय-व्होल्टेज सामन्यामुळे अन्न वितरण (Food Delivery), क्विक कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी आणि जाहिरात क्षेत्राला मोठा आर्थिक बुस्ट मिळाला.

Match-Day Economy: भारत-पाक सामन्याने मोडले रेकॉर्ड; जाहिरातदारांनी 10 सेकंदासाठी मोजले लाखो रुपये

Match-Day Economy : भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या रविवारी झालेला टी-20 विश्वचषक सामना केवळ क्रिकेटचा थरार नव्हता, तर तो अर्थव्यवस्थेसाठी एक "सुपर संडे" ठरला आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यामुळे अन्न वितरण (Food Delivery), क्विक कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी आणि जाहिरात क्षेत्राला मोठा आर्थिक बुस्ट मिळाला. सुरुवातीला पाकिस्तानच्या सहभागाबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे नाट्यमय वातावरण निर्माण झाले होते, मात्र सामना निश्चित झाल्यावर मागणी आयसीसी (ICC) नॉकआउट सामन्याइतकी वाढली. यंदा भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचे सह-यजमान असल्याने दक्षिण आशियाई बाजारपेठेत याचा मोठा परिणाम दिसून आला.

जाहिरात दरात ऐतिहासिक वाढ आणि जिओस्टारची चांदी
सामन्याच्या लोकप्रियतेचा सर्वाधिक फायदा जाहिरात क्षेत्राला झाला. नेहमीच्या सामन्यांसाठी 10 सेकंदांच्या जाहिरात स्लॉटची किंमत 20 ते 25 लाख रुपये असते, मात्र या सामन्यासाठी ती थेट 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. यामुळे जाहिरात खर्चात जवळपास 25 टक्के वाढ नोंदवण्यात आली. ब्रिटानिया, अमूल, ह्युंदाई, रॅपिडो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी प्रायोजक जिओस्टारवर इन्व्हेंटरी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा केली. जिओस्टारला या संपूर्ण स्पर्धेतून 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त जाहिरात महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्समध्ये 'ऑर्डर'चा पाऊस
क्रिकेट प्रेमींनी घरबसल्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी ऑनलाईन फूड प्लॅटफॉर्मला पसंती दिली, ज्यामुळे स्विगी आणि झोमॅटोवरील ऑर्डर्स दुप्पट झाल्या. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) नुसार, नियमित रविवारच्या तुलनेत डिलिव्हरी विक्रीत 35 टक्के ते 40 टक्के वाढ झाली आहे. तसेच, मॅच-डे कॉम्बो डिल्समुळे सरासरी ऑर्डर व्हॅल्यू (AOV) मध्ये 20 टक्के वाढ झाली. झेपिटो आणि ब्लिंकिट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी स्नॅक्स आणि पेयांचा मोठा साठा केला होता, ज्यामुळे इम्पल्स कॅटेगरीमधील ऑर्डर्समध्ये 50 टक्के पेक्षा जास्त वाढ दिसून आली.

हेही वाचा – T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषकात रंगत वाढली; 3 संघ बाद, उरलेल्या 5 संघांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती

रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 'हाऊसफुल्ल' गर्दी
प्रमुख शहरांमधील बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये लाईव्ह स्क्रीनिंगसाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक ठिकाणी जेवणाचे शुल्क (Dining Charges) दुप्पट करण्यात आले होते, तरीही ग्रुप बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. हयात सेंट्रिक जुहू सारख्या मोठ्या हॉटेल चैन्सनी पूर्ण क्षमतेने काम केले. उद्योग जगताने या सामन्याचे वर्णन एका "कार्निव्हल" प्रमाणे केले असून, नियमित रविवारच्या तुलनेत हा दिवस व्यावसायिक दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number