PMC Election 2026: पुण्यात मनसेचा ‘या’ पक्षासोबत निवडणूक लढण्यास नकार; महाविकास आघाडीच्या बैठकीकडे फिरवली पाठ

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत (MVA) जाण्याचे संकेत देणाऱ्या मनसेने आता पुण्यात वेगळी भूमिका घेतली आहे.

PMC Election 2026: पुण्यात मनसेचा ‘या’ पक्षासोबत निवडणूक लढण्यास नकार; महाविकास आघाडीच्या बैठकीकडे फिरवली पाठ

PMC Election 2026: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत (MVA) जाण्याचे संकेत देणाऱ्या मनसेने आता पुण्यात वेगळी भूमिका घेतली आहे. "आम्ही पुण्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक नाही," असे स्पष्ट करत मनसेच्या स्थानिक नेतृत्वाने युतीच्या चर्चेत 'खो' घातला आहे.

मनसेची दुहेरी भूमिका?

काही दिवसांपूर्वी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी भाजपविरोधात मविआसोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, शहराध्यक्ष आणि सरचिटणीस अजय शिंदे यांनी आता ही शक्यता फेटाळून लावली आहे. मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती होत असताना तिथे काँग्रेस सोबत नाही. त्यामुळे पुण्यात वेगळी भूमिका घेतल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. पुण्यात रात्री पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला मनसेचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले, ज्यामुळे ही दरी स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा – BMC Election 2026: मुंबई पालिका निवडणुकांसाठी AIMIM सज्ज; 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी (शरद पवार गट) सकारात्मक

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक असल्याचे समजते. मुंबई आणि पुण्यात मनसेला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी सुरू आहेत, मात्र काँग्रेसच्या समावेशावरून मनसे पुण्यात नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

इच्छुकांची गर्दी वाढली

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून पुण्यात इच्छुकांची मोठी झुंबड उडाली आहे. गेल्या 3 दिवसांत तब्बल 6,437 अर्जांची विक्री झाली आहे. पक्षाने अधिकृत नाव जाहीर करण्यापूर्वीच काही नेत्यांनी अर्ज भरले आहेत. भाजपचे योगेश मुळीक (वडगाव शेरी), राष्ट्रवादीचे मोहित बराटे (कर्वेनगर) आणि काँग्रेसचे मेहबूब नदाफ (पुणे स्टेशन परिसर) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी महापालिकेच्या हद्दवाढीमुळे प्रभागांची संख्या वाढली आहे, परिणामी उमेदवारांचा आकडा मागील निवडणुकीच्या तुलनेत (गेल्या वेळी 1,090 उमेदवार रिंगणात होते) मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number