Supriya Sule: काँग्रेस-पार्थ पवार वादावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘लोकशाही मार्गाने आपला उमेदवार…’

'काँग्रेसचा हा डाऊनफॉल असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल', या पार्थ पवार यांच्या विधानाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Supriya Sule: काँग्रेस-पार्थ पवार वादावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘लोकशाही मार्गाने आपला उमेदवार…’

Supriya Sule: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ‘काँग्रेसचा हा डाऊनफॉल असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल’, या पार्थ पवार यांच्या विधानाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “काँग्रेस हा देशातील असा पक्ष आहे ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे या पक्षाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसची पाठराखण केली.

लोकशाहीत उमेदवारीचा अधिकार सर्वांनाच
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बिनविरोध निवडीची प्रक्रिया अनेकदा होते, पण यावेळी काँग्रेसने लोकशाही मार्गाने आपला उमेदवार दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला संविधानाच्या चौकटीत राहून निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. काँग्रेसने घेतलेला निर्णय हा त्यांचा लोकशाही मार्ग असून, त्यावर टीका करण्याऐवजी लोकशाही मूल्यांचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यापासून आर्थिक धोरणांपर्यंत काँग्रेसची शिदोरी
पार्थ पवार यांच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी इतिहासाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “आज आपण जो मोकळा श्वास घेतोय, ते स्वातंत्र्य काँग्रेस पक्षाची देण आहे. इंग्रजांविरुद्धचा ‘चले जाव’ नारा असो, देशातील महिला आरक्षण असो किंवा डॉ. मनमोहन सिंग यांनी आणलेली आर्थिक सुधारणांची धोरणे असोत, काँग्रेसचे योगदान मोठे आहे. एखादा पक्ष छोटा किंवा मोठा असू शकतो, पण सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे.”

हेही वाचा – Congress on Parth Pawar : ‘कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…’, कॉंग्रेसने पार्थ पवारांवरच साधला निशाणा

अजित पवार गटाला विचारला प्रश्न
पार्थ पवार यांच्या विधानाबाबत अधिक विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी चेंडू अजित पवार गटाच्या कोर्टात टोकावला. “हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्यांना विचारला पाहिजे. त्यांच्या एका खासदाराचे हे मत असेल, तर तो त्यांच्या पक्षाचा स्टॅन्ड असू शकतो. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर तेच अधिक संयुक्तिक उत्तर देऊ शकतील,” असे सुळे यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) बारामतीमध्ये उमेदवार देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number