Joseph Vijay Govt Decisions: मुख्यमंत्री होताच जोसेफ विजय यांनी केली ‘या’ फाईलवर पहिली सही; पहिल्याच दिवशी घेतले 3 मोठे निर्णय

केवळ घोषणाबाजी न करता, विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी तीन महत्त्वपूर्ण फाईल्सवर स्वाक्षरी करून आपल्या प्रशासकीय धोरणाची दिशा स्पष्ट केली.<br/>

Joseph Vijay Govt Decisions: मुख्यमंत्री होताच जोसेफ विजय यांनी केली ‘या’ फाईलवर पहिली सही; पहिल्याच दिवशी घेतले 3 मोठे निर्णय

Joseph Vijay Govt Decisions: स्क्रीनवरील 'थलापथी' आता खऱ्या आयुष्यात तामिळनाडूच्या सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. 'टीव्हीके' (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आपल्या कामाचा झंझावात सुरू केला आहे. केवळ घोषणाबाजी न करता, विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी तीन महत्त्वपूर्ण फाईल्सवर स्वाक्षरी करून आपल्या प्रशासकीय धोरणाची दिशा स्पष्ट केली.

कर्जाचा डोंगर आणि पारदर्शकतेचे आव्हान
राज्यावर असलेल्या तब्बल 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख करत मुख्यमंत्री विजय यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, "प्रशासनाच्या खुर्चीवर बसल्यानंतर समस्यांची व्याप्ती अधिक स्पष्टपणे जाणवते. मात्र, मी जनतेला शब्द देतो की तामिळनाडूला या आर्थिक संकटातून बाहेर काढून एका प्रगत राज्याकडे नेण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन."

मुख्यमंत्री विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय:

1. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची शपथ:
पहिल्याच स्वाक्षरीसह विजय यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. "मी राजकारणात पैसा कमवण्यासाठी आलेलो नाही," असे ठणकावून सांगत त्यांनी जनतेच्या करातील प्रत्येक रुपयाचा विनियोग पारदर्शक पद्धतीने होईल, अशी ग्वाही दिली.

2. अमली पदार्थमुक्त तामिळनाडू:
तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी विशेष पुनर्वसन आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यदायी समाज घडवणे हे त्यांच्या अजेंड्यावर सर्वोच्च स्थानी आहे.

3. महिला सुरक्षेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स':
महिलांच्या सुरक्षिततेची केवळ चर्चा न करता, त्यांनी सुरक्षेसाठी एक स्वतंत्र विशेष कृती दल (Special Action Force) स्थापन करण्याच्या फाईलवर मंजुरी दिली आहे. महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासात गती आणि कठोर कारवाई यावर या दलाचा भर असेल. "माझ्या प्रशासनात भ्रष्टाचाराला शून्य थारा असेल. आपण सर्वांनी मिळून एका नव्या, सामर्थ्यवान तामिळनाडूची निर्मिती करायची आहे," असं मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा – Thalapathy Vijay: थलपती विजय यांनी आईच्या प्रेमापोटी चेन्नईत उभारलं भव्य साई मंदिर; चाहत्यांमध्ये चर्चा

थोडक्यात सांगायचे तर विजय यांनी आपल्या पहिल्याच दिवसाच्या कामकाजातून हे सिद्ध केले आहे की, त्यांचा 'रिल' लाईफमधील डॅशिंग अंदाज 'रिअल' लाईफमधील प्रशासनातही कायम राहणार आहे. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले हे पहिले पाऊल मानले जात आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number