Vijay Wadettiwar: ‘पेन ड्राईव्ह उघड झाल्यास महाराष्ट्र हादरेल…’; अशोक खरात प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

खरात प्रकरण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी एक कलंक असून, यातील पेन ड्राईव्हमधील माहिती जर उघड झाली, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.<br/>

Vijay Wadettiwar: ‘पेन ड्राईव्ह उघड झाल्यास महाराष्ट्र हादरेल…’; अशोक खरात प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Vijay Wadettiwar: भोंदू अशोक खरात यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “खरात प्रकरण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी एक कलंक असून, यातील पेन ड्राईव्हमधील माहिती जर उघड झाली, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल,” असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील अंधश्रद्धेच्या पैलूवर बोट ठेवले आहे. खरात यांच्यावर केवळ सामान्य गुन्हे न नोंदवता, ‘जादूटोणा आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी असून, यामागील मास्टरमाईंड कोण आहे, हे जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

39 जणांची यादी जाहीर करा; केसरकरांना आव्हान
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही लक्ष्य केले. “या प्रकरणात 39 जणांची एक यादी असल्याची चर्चा आहे. ही यादी नेमकी कोणाची आहे? यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे? हे सर्व तथ्य दीपक केसरकर यांनी जाहीर करावे,” असे आव्हान त्यांनी दिले. या प्रकरणातील ‘साखळी’ समोर आणण्यासाठी सरकारने पारदर्शक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Sanjay Shirsat: ‘अशोक खरातची अनेक प्रकरणं बाहेर पडतील, पण…’ संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, वडेट्टीवार यांनी या तपासावर अविश्वास दाखवत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. “या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या देखरेखीखाली झाली पाहिजे, तरच सत्य बाहेर येईल,” असे ते म्हणाले. आता खरात यांची ही ‘वरात’ नेमकी कुठपर्यंत जाते आणि यात आणखी कोणती मोठी नावे अडकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number