‘भाजपमध्ये न्याय मिळत नसेल तर…’; निवृतीच्या चर्चेदरम्यान पंकजा मुंडेंना थेट ‘या’ पक्षाकडून ऑफर

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकत्याच व्यक्त केलेल्या राजकीय निवृत्तीच्या इच्छेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

‘भाजपमध्ये न्याय मिळत नसेल तर…’; निवृतीच्या चर्चेदरम्यान पंकजा मुंडेंना थेट ‘या’ पक्षाकडून ऑफर

मुंबई:  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकत्याच व्यक्त केलेल्या राजकीय निवृत्तीच्या इच्छेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करताना पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना बाजूला सारले जात असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, पंकजा मुंडेंनी मैदानात उतरून नेतृत्व करावे, काँग्रेस त्यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहे. या अनपेक्षित ऑफरमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा रंगली आहे.

ओबीसी जनगणनेसाठी विदर्भात 'मंडल यात्रा'
दुसरीकडे, विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्कांसाठी 'मंडल यात्रा' काढण्यात येत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून देशात जातीनिहाय जनगणना करावी आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना व्हावी, या मुख्य मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, महाज्योती संस्थेला 1 हजार कोटींचा निधी देणे, लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये तरतूद करणे आणि सरकारी नोकऱ्यांमधील ओबीसींचा 1 लाख पदांचा बॅकलॉग त्वरित भरणे, या मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

हेही वाचा – Pankaja Munde : 'मला राजकारणातून निवृत्त व्हावंसं वाटतं, पण…'; राजकीय संन्यासाबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

शेतकऱ्यांच्या जमिनी आणि नाशिक कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराचा आरोप
शासनाच्या धोरणांवर सडकून टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, बड्या कंत्राटदारांचे भले करण्यासाठी आणि टक्केवारी वसूल करण्यासाठी गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात पोलिसांचा धाक दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने लाटल्या जात आहेत. समृद्धी महामार्गाच्या दुरवस्थेवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या कामात बाहेरील राज्यातील कंत्राटदारांना 30 टक्के मार्जिन देऊन बोगस कामे दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याच जनतेच्या असंतोषातून आणि संतापामधून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number