Manoj Jarange Patil: ‘भुजबळ शहाणे झाले असतील तर….’; मनोज जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर बोचरी टीका

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

Manoj Jarange Patil: ‘भुजबळ शहाणे झाले असतील तर….’; मनोज जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर बोचरी टीका

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “भुजबळ शहाणे झाले असतील तर बरं आहे.” भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला आणि सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेला सातत्याने केलेल्या विरोधाचा पार्श्वभूमीवर जरांगे यांनी हा थेट टोला लगावला असून, या विधानामुळे दोन्ही नेत्यांमधील कलगीतुरा आणखी रंगण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – TMC Split: दीदींची डोकेदुखी वाढली! पश्चिम बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती? तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीचे संकेत

‘हैदराबाद गॅझेट’ची सूचना आजच काढा; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आपली मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. सरकारने ‘हैदराबाद गॅझेट’ संदर्भातील अधिकृत सूचना आजच्या आजच जारी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. या गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याने, सरकारने यामध्ये आता अधिक वेळ न दवडता तातडीने पावले उचलावीत, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

58 लाख कुणबी नोंदींचे आदेश काढण्याची मागणी; आंदोलनाची धार कायम
निजामाकालीन आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. याच मुद्द्यावर भर देत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे महत्त्वाचा मागणी केली आहे. तपासणीत समोर आलेल्या तब्बल 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र वाटप करण्याचे अधिकृत आदेश सरकारने तात्काळ काढावेत, असे जरांगे यांनी म्हटले आहे. या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव वाढवला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number