Tamil Nadu Election Result 2026: ‘धोनीलाही मागे टाकेन…’; थलपती विजयच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

विजय यांना जिंकवल्यानंतर मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही जास्त लोकप्रिय होईन, असा दावा करणारा प्रशांत किशोर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.<br/>

Tamil Nadu Election Result 2026: ‘धोनीलाही मागे टाकेन…’; थलपती विजयच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Tamil Nadu Election Result 2026: तमिळनाडूच्या राजकारणात सध्या अभिनेता विजय आणि त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने विजयाची पताका फडकवत सर्वांनाच थक्क केले आहे. मात्र, या यशाची नांदी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्षभरापूर्वीच सांगितली होती. “विजय यांना जिंकवल्यानंतर मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही जास्त लोकप्रिय होईन,” असा दावा करणारा प्रशांत किशोर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रशांत किशोर यांचा ‘तो’ आत्मविश्वास
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रशांत किशोर तमिळनाडूतील लोकप्रियतेवर भाष्य करताना दिसत आहेत. ते म्हणतात, “तमिळनाडूत एमएस धोनी हा एकमेव असा बिहारी आहे, ज्याची लोकप्रियता माझ्यापेक्षा जास्त आहे. पण ज्या दिवशी मी विजय यांच्या पक्षाला (TVK) विजयापर्यंत पोहोचवीन, त्या दिवशी मी धोनीलाही लोकप्रियतेत मागे टाकेन.” आज निवडणूक निकालांच्या कलांनी प्रशांत किशोर यांचा हा शब्द खरा करून दाखवला आहे.

‘राजकीय चाणक्या’चा अचूक अंदाज
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी अनेकदा विजय यांच्या राजकीय भविष्याबद्दल सकारात्मक भाकीत केले होते. विजय यांनी जर कोणाच्याही कुबड्या न घेता स्वतंत्रपणे संघर्ष केला, तर त्यांना सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता.

भविष्यवाणी खरी ठरली 
ज्यावेळी लोक विजय यांच्या राजकारणातील एन्ट्रीकडे साशंकतेने पाहत होते, तेव्हा केवळ प्रशांत किशोर यांनीच त्यांच्या विजयाचा दावा केला होता. सध्याचे निकाल पाहता प्रशांत किशोर यांना ‘भारतीय राजकारणाचे चाणक्य’ का मानले जाते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

हेही वाचा – West Bengal Election 2026: भाजप कार्यकर्त्यांचा ममतादीदींच्या घराबाहेर ‘जय श्री राम’चा जयघोष; 185 जागांवर आघाडी घेत भाजपचे ‘बहुमत’ पार

आयपॅक सोडली तरी ‘नजर’ कायम
प्रशांत किशोर सध्या स्वतःची ‘आयपॅक’ ही संस्था सोडून बिहारमध्ये ‘जनसुराज’च्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. तरीही तमिळनाडूच्या राजकीय नाडीवर त्यांची पकड किती मजबूत होती, हे या निकालांनी सिद्ध केले आहे. थलापती विजय यांच्या यशाने केवळ तमिळनाडूच नव्हे, तर देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number