Chandrashekhar Bawankule: ‘मी 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार…’; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यांच्याकडे 80 एकर जमीन असल्याचा जो प्रचार केला जात आहे, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.

Chandrashekhar Bawankule: ‘मी 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार…’; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा

Chandrashekhar Bawankule: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मालमत्तेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझी आणि माझ्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून, याप्रकरणी मी संबंधितांवर 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,’ अशी आक्रमक भूमिका बावनकुळे यांनी घेतली आहे. आपल्या नावावर 80 एकर जमीन असल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

बदनामीचा कट आणि जमिनीचा खरा आकडा
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यांच्याकडे 80 एकर जमीन असल्याचा जो प्रचार केला जात आहे, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. ‘माझ्या नावावर केवळ 28 एकर शेती आहे. एकीकडे 80 एकर जमीन दाखवून माझ्या मुला-मुलीची आणि संपूर्ण परिवाराची नाहक बदनामी केली जात आहे. 1 जानेवारीपासून माझ्याविरोधात जाणीवपूर्वक चुकीचा प्रयत्न सुरू आहे,’ असे बावनकुळे यांनी नमूद केले.

न्यायालयीन लढाई आणि 10 कोटींचा दावा
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बावनकुळे यांनी आता कायदेशीर पावले उचलण्याचे ठरवले आहे. ते म्हणाले, ‘याप्रकरणी पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केला आहे, परंतु आता मी स्वतः न्यायालयात जाणार आहे. ज्या टीमने किंवा व्यक्तींनी माझी खोटी माहिती पसरवून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांवर मी 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.’

हेही वाचा – Rohit Pawar On Ashok Kharat: ‘हवाला, दुबई कनेक्शन अन् भ्रष्ट नेते…’; खरात प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

कौटुंबिक प्रतिमेचे रक्षण
विरोधकांकडून होणारे आरोप केवळ राजकीय नसून ते वैयक्तिक पातळीवर गेल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. आपल्या कुटुंबाकडे असलेल्या जमिनीचे सर्व तपशील स्पष्ट असतानाही आकड्यांची फुगवट करून सांगणे हा षडयंत्राचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात या न्यायालयीन लढाईमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number